मित्राच्या लग्नात काहीशा अशा अंदाजात दिसला सलमान खान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 04:02 PM2018-03-09T16:02:55+5:302018-03-09T21:32:55+5:30
बॉलिवूड स्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाची तयारी करीत आहे. त्यामुळे तो सध्या खूपच व्यस्त आहे. ...
ब लिवूड स्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाची तयारी करीत आहे. त्यामुळे तो सध्या खूपच व्यस्त आहे. मात्र अशातही त्याने वेळात वेळ काढून आपल्या एका जवळच्या मित्राच्या लग्नात हजेरी लावली. खरं तर सलमान नातेसंबंध जपण्यासाठी ओळखला जातो. मैत्री असो वा दुश्मनी, सलमान अखेरपर्यंत कायम ठेवतो. भाईजानचा असाच काहीसा अंदाज यावेळेस बघावयास मिळाला. त्याने सर्व काम सोडून श्वेता कौशिक आणि बॉबच्या लग्नात हजेरी लावली. या लग्नसमारंभातील सलमानचे बरेचसे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सलमान खूपच खूश दिसत आहे. सलमानच्या चेहºयावर सातत्याने स्माइल दिसत आहे. यावेळी सलमानने ब्लॅक सूट परिधान केला होता.
हा लग्नसोहळा ८ मार्च रोजी जागतिक महिलादिनी पार पडला. त्यामुळे सलमान महिलादिनी काय करत होता ही बाब आता स्पष्ट झाली आहे. दरम्यान, सलमानने त्याच्या आगामी ‘रेस-३’ची शूटिंग पूर्ण केली आहे. सलमानचा हा चित्रपट ईदनिमित्त प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर सलमान प्रभूदेवाच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेल्या ‘दबंग-३’ची तयारी करीत आहे. सलमानचा ‘दबंग-३’ आणि रणवीर सिंगचा ‘सिम्बा’ एकाच दिवशी २८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, सलमानने आज ट्विटरवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये सलमानसोबत बरेचसे लोक दिसत आहेत. सलमानसोबत दिसत असलेल्या या सर्व लोकांनी त्यांच्या आयुष्यात काही तरी हटके केले आहे. खºया अर्थाने ते हिरोज् असल्याचे स्वत: सलमाननेच ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या सर्वांच्या कथा ‘बीर्इंग ह्यूमन’च्या माध्यमातून लवकरच सर्वांसमोर आणल्या जातील, असेही सलमानने म्हटले.