मित्रासाठी कायपण! सलमान खानने होस्ट केलं आयराचं मेहंदी फंक्शन, भाईजानच्या घरी पोहोचला आमिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 10:10 IST2024-01-03T09:47:28+5:302024-01-03T10:10:19+5:30
काल रात्री आमिर खान मुलगा जुनैद खान, दोन्ही एक्स वाईफ किरण राव आणि रीना दत्ता सलमानच्या घरी पोहोचले.

मित्रासाठी कायपण! सलमान खानने होस्ट केलं आयराचं मेहंदी फंक्शन, भाईजानच्या घरी पोहोचला आमिर
भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान (Aamir Khan) यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अनेक वर्षांपासून दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. आमिर खानची लेक आयरा खान (Ira Khan) आज लग्नबंधनात अडकत आहे. काल आयराची मेहंदी सेरेमनी पार पडली. हे मेहेंदी फंक्शन सलमान खानच्या बांद्रा स्थित गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. काल रात्री आमिर खान मुलगा जुनैद खान, दोन्ही एक्स वाईफ किरण राव आणि रीना दत्ता सलमानच्या घरी पोहोचले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सलमान खानने आपल्या मित्राच्या लेकीसाठी त्याच्या घरी खास मेहंदी फंक्शनचं आयोजन केलं होतं. सलमानचं गॅलक्सी अपार्टमेंट प्रकाशमय झालं होतं. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आमिर खान लेक जुनैद खानसह गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताना दिसतोय. आमिर खानने ब्लॅक टीशर्ट आणि खाकी पँट अशा कॅज्युअल लूकमध्ये एन्ट्री घेतली. जुनैद खानही चेक्स शर्टमध्ये हँडसम दिसत होता.
आज आयरा बॉयफ्रेंड नुपूर शिखारेसोबत लग्नबंधनात अडकत आहे. काल दुपारी आयराची हळदही पार पडली. यावेळी आमिर खानच्या कुटुंबातील सर्वांनीच नऊवारी साडी नेसत महाराष्ट्रीयन लूक केला होता. त्यांचा फॅमिली व्हिडिओ काल दिवसभर सोशल मीडियावर हिट होता. आयरा आणि नुपूर आज ताज लँड्स एंड येथे रजिस्टर मॅरेज करणार आहेत.यानंतर कुटुंबासोबत रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. 8 जानेवारी रोजी दोघांचं उदयपूर येथे ग्रँड वेडिंग पार पडणार आहे. यानंतर बॉलिवूड कलाकारांसाठी रिसेप्शन पार्टीचंही आयोजन होणार आहे.