म्हातारा झालास, रोमान्स करताना लाज वाटत नाही का? ट्रोलर्सच्या टीकेला सलमान खानचं ‘गजब’ उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 06:55 PM2021-05-02T18:55:52+5:302021-05-02T18:58:56+5:30
या वयात रोमान्स करताना लाज वाटत नाही का? अशा शब्दांत सलमानला ट्रोल केले जात आहे. आता यावर दबंग खान शांत कसा राहणार?
सलमान खान (Salman Khan) , दिशा पाटनी (Disha Patani ), रणदीप हुड्डा यांचा ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe Your Most Wanted Bhai) हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटीवर रिलीज होणा-या या सिनेमात सलमान धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे. शिवाय दिशा पाटनीसोबत त्याचा ऑनस्क्रिन रोमान्सही प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे, यात सलमान दिशाला किस करतानाही दिसणार आहे. आता भाईजानच्या नो किसींग पॉलिसीचे काय? असा प्रश्न तुम्ही विचाराल. पण हा किसींग सीन त्याने डक्ट टेपच्या सहाय्याने दिला आहे. म्हणजेच हा काही खराखुरा किसींग सीन नाही. अर्थात तरिही सलमानच्या या किसींग सीनवर अनेकांनी टीका केली आहे. या वयात रोमान्स करताना लाज वाटत नाही का? इतका म्हातारा झाला असताना दिशासोबत कसा काय रोमान्स करू शकतो? अशा शब्दांत सलमानला ट्रोल केले जात आहे. आता यावर दबंग खान शांत कसा राहणार? टीकाकारांच्या या प्रश्नांना त्याने आपल्या भाषेत उत्तर दिले आहे.
मी या वयात अॅक्शन करू शकतो तर रोमान्स का नाही? असा उलट सवाल त्याने टीकाकारांना केला आहे. राहिला प्रश्न दिशासोबतच्या रोमान्सचा़ तर सिनेमात ती माझ्या वयाची नाही तर मी तिच्या वयाचा दिसतोय, त्यामुळे पुन्हा असले प्रश्न मला विचारू नका, असे सलमानने टीकाकारांना बजावले आहे.
‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सलमान आणि दिशाच्या किसिंग सीनची चांगलीच चर्चा रंगली होती. या किसींग सीनबद्दल खुलासा करणारा व्हिडीओ दिशाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘राधे’ची संपूर्ण टीम ही त्यांच्या प्रवासाबद्दल सांगताना दिसत आहे. यावेळी सलमानही किसिंग सीनवर बोलतोय, ‘चित्रपटात एक किसिंग सीन आहे. मी दिशासोबत हा सीन केला आहे. पण, मी दिशाला किस केलेले नाही. तर, सेलोटेपवर किस केले आहे,’ असे सलमान त्या व्हिडीओमध्ये सांगतोय.
सलमानने आजवर कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन दिलेला नाही. लाजाळू स्वभावामुळे तो इंटिमेट आणि किसिंग सीन देत नाही.