सलमान खानने पडत्या काळात बॉबी देओलला केला होता कॉल, 'रेस 3'साठी ठेवली होती ही अट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 09:37 AM2023-11-01T09:37:43+5:302023-11-01T09:38:57+5:30

Bobby Deol : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल लवकरच 'अ‍ॅनिमल' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन ८' मध्येही दिसणार आहे.

Salman Khan made a call to Bobby Deol during the fall, this condition was kept for 'Race 3' | सलमान खानने पडत्या काळात बॉबी देओलला केला होता कॉल, 'रेस 3'साठी ठेवली होती ही अट

सलमान खानने पडत्या काळात बॉबी देओलला केला होता कॉल, 'रेस 3'साठी ठेवली होती ही अट

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) लवकरच 'अ‍ॅनिमल' (Animal) चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन ८' मध्येही दिसणार आहे. तो त्याचा मोठा भाऊ सनी देओलसोबत या शोमध्ये हजेरी लावणार आहे. दरम्यान, बॉबी देओलने 'रेस ३' बद्दलची गोष्ट शेअर केली.

बॉबी देओलने खुलासा केला की, सलमान खानने त्याला 'रेस ३'चा भाग व्हायचे असेल तर शर्ट काढावा लागेल असे सांगितले होते. सोशल मीडियावर 'लॉर्ड बॉबी' म्हणून ओळखला जाणारा बॉबी दिग्दर्शक-निर्माता करण जोहर होस्ट करत असलेल्या 'कॉफी विथ करण' या लोकप्रिय चॅट शोच्या दुसऱ्या पर्वात दिसणार आहे. बॉबी देओल म्हणाला, "सलमानने मला सांगितले की, 'हे बघ, जेव्हा माझे करिअर चांगले चालले नव्हते, तेव्हा मी तुझ्या भावाच्या पाठीवर चढलो, मी पुढे गेलो, मी संजय दत्तच्या पाठीवर चढलो. मी पुढे सरकलो."

बॉबी देओलला असा मिळाला रेस ३
'आश्रम' अभिनेता म्हणाला, "आम्ही एकमेकांना मामू म्हणतो, म्हणून मी त्याला म्हणालो, 'मामू, कृपया मला तुमच्या पाठीवर चढू द्या'... माझी ही गोष्ट सलमानला आठवली. काही वर्षांनी मला त्याचा फोन आला. तो मला म्हणाला, "मामू शर्ट काढशील का." मी पटकन म्हणालो, "हो मामू, मी काहीही करेन." असाच मला 'रेस ३' हा चित्रपट मिळाला. 

'कॉफी विथ करण' सीझन ८ डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारीत होईल. पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दिसले होते आणि हा एपिसोड खूप गाजला होता.

Web Title: Salman Khan made a call to Bobby Deol during the fall, this condition was kept for 'Race 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.