कतरिना-करीनापेक्षा जास्त ग्लॅमरस आहे सलमानची ही हिरोईन, बॉलिवूडला केला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:53 IST2025-02-25T12:52:20+5:302025-02-25T12:53:30+5:30
सौंदर्यात बॉलिवूडच्या अव्वल नायिकांना मागे टाकणारी ही अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवू शकली नाही.

कतरिना-करीनापेक्षा जास्त ग्लॅमरस आहे सलमानची ही हिरोईन, बॉलिवूडला केला रामराम
सलमान खान(Salman Khan)ला उगाच बॉलिवूडचा सुपरस्टार म्हटले जात नाही, त्याचा कोणताही सिनेमा बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवतो. त्यामुळे सलमान खानला ब्लॉकबस्टर किंग असेही म्हटले जाते. सलमान खानने अनेक सुंदर चेहऱ्यांना आपल्या चित्रपटांमध्ये संधी दिली आणि येथूनच त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. कतरिना कैफ(Katrina Kaif)पासून ते डेजी शाहपर्यंत अनेक नायिकांचे नशीब सलमान खानसोबत काम केल्यानंतर बदलले. मात्र आज आम्ही अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केले गेले होते, परंतु तिला इतर अभिनेत्रींसारखे यश मिळू शकले नाही. सौंदर्यात बॉलिवूडच्या अव्वल नायिकांना मागे टाकणारी ही अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवू शकली नाही.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून एली लार्टर (Ali Larter) आहे. एली लार्टरने सलमान खानसोबत 'मेरीगोल्ड' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सलमान खानने प्रेम राजपूत आणि एली लार्टरने मॅरीगोल्ड लेक्सटनची भूमिका साकारली होती. एक तास ५० मिनिटांचा हा चित्रपट विलार्ड कॅरोल दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडी होता. या चित्रपटात नंदना सेनही महत्त्वाच्या भूमिकेत होती. चित्रपटाची कथा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकली नाही.
अशी होती चित्रपटाची कथा
चित्रपटाची कथा मेरीगोल्ड या अमेरिकन मुलीभोवती फिरते जी हिरोईन बनण्यासाठी भारतात येते. ती मुंबईत येते, तिही एका चित्रपटात छोटी भूमिका साकारण्यासाठी. भारतात पोहोचल्यावर तिला कळते की चित्रपट रखडला आहे आणि पुन्हा बनवला जाणार नाही. अशा परिस्थितीत, ती भारतात काम शोधते आणि एका संगीतमय चित्रपटात काम करते, ज्यामध्ये काम करताना ती एका कोरिओग्राफरच्या प्रेमात पडते, ज्याचे नाव असते प्रेम राजपूत. प्रेम, जो राजस्थानचा आहे, तिला सांगतो की त्याच्या आजीने आधीच सांगितले होते की तो मेरीगोल्ड नावाच्या मुलीच्या प्रेमात पडेल आणि यामुळे मेरीगोल्ड त्याच्याकडे आकर्षित होते आणि ती त्याच्यासोबत त्याची बहीण पूजाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जोधपूरला जाते. तिथे गेल्यावर कळते की प्रेम एका राजघराण्यातील आहे आणि त्याचे लग्न जान्हवी नावाच्या मुलीशी आधीच निश्चित झाले आहे आणि कोणीही अरेंज मॅरेजच्या विरोधात जाऊ शकत नाही.
चित्रपटाला मिळाली नाही पसंती
भारतीय परंपरा दाखवणारा हा चित्रपट लोकांना आवडला नाही आणि त्यांनी तो नाकारला. समीक्षकांनीही या चित्रपटाला दाद दिली नाही. १९ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट २ कोटींचीही कमाई करू शकला नाही. विलार्ड कॅरोल हे एक प्रस्थापित अमेरिकन चित्रपट निर्माते होते ज्यांनी भारतात येण्यापूर्वी 'द रुनस्टोन', 'प्लेइंग बाय हार्ट' आणि 'टॉम्स मिडनाईट गार्डन' सारखे चित्रपट बनवले होते. पण 'मेरीगोल्ड' हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपट लेखन आणि निर्मितीपासूनही त्यांनी स्वतःला दूर ठेवले.
एली लार्टर सध्या काय करते?
या चित्रपटाची मुख्य नायिका एली लार्टरही हॉलिवूडमधला एक प्रसिद्ध चेहरा होता. या चित्रपटानंतर ती बॉलिवूडपासून पूर्णपणे दुरावली. 'लीगली ब्लोंड', 'फायनल डेस्टिनेशन' आणि टीव्ही शो 'हीरोज'मध्ये सहाय्यक भूमिकांसाठी ओळखले जाते. 'मेरीगोल्ड' हा तिचा एकमेव हिंदी चित्रपट ठरला. त्याच वर्षी तिने हॉलिवूडमध्ये 'रेसिडेंट एव्हिल: एक्सटींक्शन' नावाचा सुपरहिट चित्रपट दिला. सध्या ही अभिनेत्री हॉलिवूडमध्ये पूर्णपणे सक्रिय आहे आणि सतत चित्रपटांमध्ये काम करत आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. गेल्या वर्षी ती शेवटचा 'लँडमॅन'मध्ये दिसली होता, ज्याचे खूप कौतुक झाले होते.