Tiger 3: 'जब तक मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं'! भाईजानच्या सिनेमाचा दमदार टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:03 PM2023-09-27T12:03:24+5:302023-09-27T12:11:21+5:30

'टायगर 3' चे निर्माता टायगरचा मेसेज घेऊन आले आहेत.

salman khan movie tiger 3 teaser released movie releasing in diwali this year | Tiger 3: 'जब तक मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं'! भाईजानच्या सिनेमाचा दमदार टीझर रिलीज

Tiger 3: 'जब तक मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं'! भाईजानच्या सिनेमाचा दमदार टीझर रिलीज

googlenewsNext

सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित सिनेमा 'टायगर 3' (Tiger 3) दिवाळीत प्रदर्शित होतोय. सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टायगरचे चाहते या सिनेमासाठी खूपच आतुर आहेत. सलमानचे मागचे काही चित्रपट दणकून आपटले. त्यामुळे आता 'टायगर 3' कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहे. 'एक था टायगर ' आणि 'टायगर जिंदा है'च्या तुफान यशानंतर आता 'टायगर 3' रिलीज होण्यास सज्ज आहे. पुन्हा एकदा टायगर आणि झोयाची लव्हस्टोरी आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 

'टायगर 3' चे निर्माता टायगरचा मेसेज घेऊन आले आहेत. यशराज फिल्म्स निर्माता यश चोप्रा यांच्या आज जयंती दिवशी 'टायगर 3'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टीझर प्रमोशन अभियानाची सुरुवात आहे. 'जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं' हा डायलॉग काही क्षणात व्हायरल झालाय. या टीझरमध्ये केवळ सलमान खान दिसत असून कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी मात्र कुठे दिसत नाहीत. यावेळी इम्रान हाश्मी खलनायक असून सलमान खानसोबत भिडताना दिसणार आहे. 

टीझरवरच्या सुरुवातील टायगर स्वत:चं नाव अविनाश राठोड असं सांगतो. त्याला गद्दार घोषित करण्यात आलेलं असतं. आता टायगरसमोर दोन आव्हानं आहेत. स्वत:वर लागलेला डाग पुसणे आणि दुसरा मुलाच्या नजरेत हिरो होणे. मुलाला वडिलांना हिरो म्हणून बघता येईल की गद्दार म्हणून याचा निर्णय सरकारच घेईल. जर मी जीवंत राहिलो तर परत येईन नाही तर जयहिंद! 

टायगरचा मेसेज आता त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचला असून सगळेच उत्सुक आहेत.  दिवाळीत सिनेमा प्रदर्शित होतोय. मनीष शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय तर ही यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असणार आहे.

Web Title: salman khan movie tiger 3 teaser released movie releasing in diwali this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.