Farrey Box Office : सलमानच्या भाचीचा 'फर्रे' बॉक्स ऑफिसवर आपटला, तीन दिवसांत कमावले फक्त 'इतके' रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 14:02 IST2023-11-27T14:01:56+5:302023-11-27T14:02:48+5:30
सलमानच्या भाचीचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. 'फर्रे' सिनेमाचं बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलं आहे.

Farrey Box Office : सलमानच्या भाचीचा 'फर्रे' बॉक्स ऑफिसवर आपटला, तीन दिवसांत कमावले फक्त 'इतके' रुपये
सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सलमान खानच्या टायगर ३नंतर त्याची भाची अलिजेह अग्निहोत्रीचा 'फर्रे' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातून अलिजेहने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सलमानची बहीण अलवीरा अग्निहोत्री हिची अलिजेह लेक आहे. पण, सलमानच्या भाचीचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. 'फर्रे' सिनेमाचं बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलं आहे.
'फर्रे' सिनेमा कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर आधारित आहे. भाचीच्या पहिल्याच सिनेमाचं सलमाननेही प्रमोशन केलं होतं. फर्रे सिनेमातील अलिजेहच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. पण, या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. बॉक्स ऑफिसवर फर्रे सपशेल फेल ठरत आहे. शुक्रवारी(२४ नोव्हेंबर) सर्वत्र प्रदर्शित झालेल्या फर्रेने पहिल्या दिवशी केवळ ५० लाखांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७८ लाख रुपयांचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. या सिनेमाने तिसऱ्या दिवशी ९३ लाख रुपयांची कमाई केली. त्यामुळे तीन दिवसांत या चित्रपटाला ३ कोटींचाही आकडा पार करता आलेला नाही.
'फर्रे' सिनेमाचं दिग्दर्शन नॅशनल पुरस्कार प्राप्त सौमेंद्र पाढी यांनी केलं आहे. या सिनेमात अलिजेहसह जेन शॉ, साहिल मेहता, प्रसन्ना बिष्ट, रोनित रॉय आणि जूही बब्बर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.