या आजाराने बेजार झाला होता सलमान खान; अनेकदा मनात यायचा आत्महत्येचा विचार...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 15:17 IST2022-03-22T15:16:01+5:302022-03-22T15:17:31+5:30
Salman Khan : पन्नाशी ओलांडूनही सल्लू इतका फिट दिसतो. पण कधीकाळी हा सुपर फिट सलमान एका आजाराने बेजार झाला होता. होय, आजारही असा की जीवघेण्या असह्य वेदना देणारा.

या आजाराने बेजार झाला होता सलमान खान; अनेकदा मनात यायचा आत्महत्येचा विचार...!!
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan ) सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. कितीही बिझी शेड्यूल असो, सलमान वर्कआऊटसाठी वेळ काढतोच काढतो. म्हणूनच पन्नाशी ओलांडूनही सल्लू इतका फिट दिसतो. पण कधीकाळी हा सुपर फिट सुपरस्टार एका आजाराने बेजार झाला होता. होय, आजारही असा की जीवघेण्या असह्य वेदना देणारा. खुद्द सलमानने ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या आजाराचा खुलासा केला होता.
सलमानच्या या आजाराचं नाव होतं ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया (Trigeminal Neuralgia). या आजाराला ‘सुसायडल डिसिज’ देखील म्हटलं जातं.
मनात आत्महत्येचे विचार यायचे...
सलमान या आजारावर म्हणाला होता की, ‘ 2001 मध्ये मला हा आजार असल्याचं निदान झालं होतं. हा आजार झाल्यानंतर माझा आवाज कापू लागला. तो कर्कश झाला. त्यामुळे मी बोलायचो तेव्हा मी दारूच्या नशेत बोलतोय, असं लोकांना वाटायचं. या आजारानंतर अनेकदा माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. कारण या आजारात मला असह्य वेदना व्हायच्या. अगदी मी बोलूही शकत नसे. त्यानंतर मी या आजारावर अमेरिकत जाऊन योग्य उपचार घेतल आणि या वेदनादायी आजारातून मी बरा झालो. या आजारात असह्य वेदना होतात. अनेकदा वेदना सहन न झाल्यानं अनेक लोक आत्महत्या करतात.
ट्रायजेमिनल न्युरोलॉजी हा आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या नसांवर परिणाम होतो. त्यामुळे रूग्णाला प्रचंड डोकेदुखी होते. शरीरामध्ये इलेक्ट्रिक शॉक दिल्यासारख्या वेदना होतात. या वेदना असह्य झाल्यानं अनेकदा हा आजार झालेल्या व्यक्ती आत्महत्या देखील करतात. त्यामुळेच या आजाराला सुसाईड डिसिज देखील म्हणतात.