काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 05:53 PM2020-09-14T17:53:51+5:302020-09-14T18:01:24+5:30

सोमवारी या प्रकरणाची सुनावणी सुरु होती.

Salman khan ordered to appear in jodhpur court on september 28 in this case | काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश

googlenewsNext

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला  28 सप्टेंबरला जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. सलमानच्या याचिकेवर काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी आणि राज्य सरकारच्या याचिकेवर शस्त्र कायद्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. पुढील सुनावणीच्या वेळी सलमानला स्वत: कोर्टात हजर होण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे 28 सप्टेंबरला सलमानला जोधपूर न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

काय आहे प्रकरण 
हम साथ साथ है या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू असताना सलमान आणि या चित्रपटातील त्याच्या काही सहकलाकारांनी काळवीटाची शिकार केली असल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात सलमानला दोषी ठरवण्यात आले असले तरी त्याचे सहकलाकार अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले होते.


कोणी केली होती तक्रार
विष्णोई समाजातील लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर वनविभाग आणि पोलिस दोघेही सक्रीय झाले. त्यानंतर सलमान आणि त्याच्या साथीदारांवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले. सलमान व्यतिरिक्त सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांनाही यात आरोपी करण्यात आले होते, परंतु या सर्वांना कोर्टाने निर्दोष सोडले.

खबरदार! अजिबात भेटायचं नाही मलायकाला, अशी सलमानने अर्जुन कपूरला दिली होती सक्त ताकीद

 

Web Title: Salman khan ordered to appear in jodhpur court on september 28 in this case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.