क्या बात! 'या' अभिनेत्याच्या मदतीसाठी धावून आला सलमान, 'इतक्या' लाखांची हॉस्पिटलची बिलं केली पे!
By अमित इंगोले | Published: October 15, 2020 10:32 AM2020-10-15T10:32:06+5:302020-10-15T10:39:04+5:30
आता अभिनेत्री कश्मीरा शाहने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली की, फराज खानची हॉस्पिटलची सगळी बिलं सलमान खान पे करत आहे.
'मेहंदी' सिनेमात काम केलेला अभिनेता सध्या हॉस्पिटलमध्ये जीवनाशी झुंज देत आहे. फराज खानकडे उपचाराकडे काहीच पैसे नाहीत. अशात पूजा भट्टने तिच्यासाठी मदतीचं आवाहन केलं होतं. आता अभिनेत्री कश्मीरा शाहने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली की, फराज खानची हॉस्पिटलची सगळी बिलं सलमान खान पे करत आहे.
फराज आजारी असून बंगळुरूच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती असल्याची माहिती पूजा भट्टने पोस्टच्या माध्यमातून दिली होती. तसेच त्याला लगेच उपचारासाठी २५ लाख रूपयांची गरज असल्याचेही ती म्हणाली होती. यानंतर अनेकांनी काही मदतही केली होती.
Please share and contribute if possible. I am. Would be grateful if any of you can as well. 🙏https://t.co/UZSbvA2sZb
— Pooja Bhatt (@PoojaB1972) October 14, 2020
अशात कश्मीरा शाहने पोस्ट करत लिहिले की, 'तू खरंच ग्रेट ह्यूमन बिईंग आहे. फराज खानची काळजी घेण्यासाठी आणि त्याचे बिल भरण्यासाठी धन्यवाद. अभिनेता फराज खानची स्थिती गंभीर हे आणि सलमान खानने त्याला वेळीच मदत केली जशी तो नेहमीच करतो. लोकांना जर ही पोस्ट आवडली नाही तर मला फरक पडणार नाही. मला अनफॉलो करण्याचा तुमच्याकडे पर्याय आहे. मला वाटतं सलमान इंडस्ट्रीतील सर्वात चांगला माणूस आहे'.
दरम्यान, फराज खान ९०च्या दशकाच्या शेवटी शेवटी २००० सालात चांगलाच लोकप्रिय झाला होता. फराजने 'फरेब', 'पृथ्वी', 'मेहंदी', 'दुल्हन बनूं मै तेरी', 'दिल ने फिर याद किया', 'चांद बुझ गया' सारख्या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर तो टीव्हीवरील काही शोजमध्येही दिसला होता.
त्याचा लहान भाऊ टीव्ही अभिनेता फहमान खानने सांगितले होते की, 'फराज गेल्या १ वर्षांपासून छातीच्या इन्फेक्शनने आजारी आहे. काही दिवसांपूर्वी त्याची स्थिती फारच नाजूक झाली होती. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. त्यानंतर समजलं की, फराजला ब्रेनमध्ये इन्फेक्शन आहे. हर्पिस संक्रमणामुळे त्याला तिनदा अटॅक येऊन गेले आहेत.
फहमान खानने सांगितले की, 'भाऊ गेल्या पाच दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहे आणि डॉक्टरांनुसार, त्याचा जीव वाचण्याची केवळ ५० टक्के शक्यता आहे. उपचाराचा प्रभाव होत आहे. पण तो बेशुद्ध आहे. पुढील उपचारासाठी आम्हाला २५ लाख रूपयांची गरज आहे'.