CoronaVirus: लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना सलमान खानने झापलं, म्हणाला की - यांचा मुर्खपणा सर्वांना संपवेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 10:42 AM2020-04-16T10:42:03+5:302020-04-16T10:43:55+5:30

लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर चांगलाच भडकला भाईजान, सुनावले खडेबोल

Salman Khan to people violating lockdown Why do you want to put the lives of your family members in danger? TJL | CoronaVirus: लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना सलमान खानने झापलं, म्हणाला की - यांचा मुर्खपणा सर्वांना संपवेल

CoronaVirus: लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना सलमान खानने झापलं, म्हणाला की - यांचा मुर्खपणा सर्वांना संपवेल

googlenewsNext

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान माजवले आहे. तसेच भारतातही या महारोगराईचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउन जाहीर केले आहे आणि लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. तरीदेखील काही जण लॉकडाउनचे उल्लंघन करीत मोकाट फिरत आहेत. पनवेल येथील फार्महाऊसमध्ये अडकलेल्या सलमान खानने लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍यांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी झटणारे पोलिस, डॉक्टर, नर्स यांच्यासोबत बॅंक कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत. हा मेसेज त्याने व्हिडिओतून दिला आहे.

सलमान खान दोन दिवसांच्या सुट्टीसाठी आई, दोन्ही बहिणी आणि त्यांच्यामुलांसोबत पनवेलला आला होता. मात्र अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्याला तिथेच रहावे लागले. अशा परिस्थितीमध्येही त्यांनी तिथे नियम बनवला आहे. कुणी इथून बाहेर जाणार नाही आणि बाहेरून इथे येणार नाही. दरम्यान हाच नियम आता सगळ्यांनी काटेकोरपणे पाळायची गरज आहे. काही मोजक्या लोकांच्या बेशिस्त आणि बेफिकीर वृत्तीमुळे देशात परिस्थिती बिघडत आहे. वेळीच सगळ्यांनी लॉकडाऊन काटेकोरपणे पाळला असता तर सारेच मोकळे झाले असते. पण काहींना या संकटाचं गांभीर्य अजून समजत नसल्याने विनाकारण ते रस्त्यांवर फिरत आहेत आणि पोलिसांना त्यांच्यावर कडक कारवाई करत आहेत, असे सलमान खानने सांगितले.

ती पुढे म्हणाली की, लॉकडाऊनचं उल्लंघन करण्यात ज्यांना हुशारी वाटत आहे त्यांच्यामध्ये इतकी शूरता आहे का? की जे त्यांच्या चुकीमुळेच त्यांच्या प्रियजनांची तिरडी उचलू शकतील? 'राम नाम...' म्हणत त्यांना कायमचं गमवू शकतील? कोरोना व्हायरसवर सध्या उपचार नाहीत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लोकांचा मूर्खपणा सार्‍यांना संपण्याचं कारण ठरू शकतं. कृपया लॉकडाऊनचं पालन करा आणि घरात बसा असे आवाहन सलमान खानने केले आहे.

यासोबतच रूग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी धडपड करणार्‍या डॉक्टरांवरील हल्ल्याचाही सलमान खानने निषेध केला आहे. प्रार्थना, नमाज घरच्या घरीच करा. माणसांतच देव आहे ही लहानपणी आपल्याला दिलेली शिकवण आठवा, असेही भाईजानने सांगितले.

Web Title: Salman Khan to people violating lockdown Why do you want to put the lives of your family members in danger? TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.