...अन् अनंत अंबानी-राधिकाच्या संगीत सोहळ्यात सलमानने वाजवला ढोल, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 14:16 IST2024-07-07T14:14:23+5:302024-07-07T14:16:01+5:30
Anant Ambani Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या वेडिंग सोहळ्यातील सलमानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो ठुमके लगावताना आणि त्याबरोबरच ढोल वाजवतानाही दिसत आहे.

...अन् अनंत अंबानी-राधिकाच्या संगीत सोहळ्यात सलमानने वाजवला ढोल, व्हिडिओ व्हायरल
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: सध्या जिकडेतिकडे चर्चा आहे ती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची...आधी प्री-वेडिंग आणि आता वेडिंग सोहळ्यातील कार्यक्रमांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकतंच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याला कलाविश्वातील सिनेतारकांनीही हजेरी लावली होती. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही या संगीत सोहळ्याला उपस्थित होता. सेलिब्रिटींनी या संगीत सोहळ्यात ताल धरत चार चांद लावले. तर भाईजाननेही त्याच्या हटके स्टाइलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. काळ्या रंगाचं टीशर्ट आणि पँट असा साधाच लूक करून सलमान अंबानींच्या वेडिंग सोहळ्यात पोहोचला होता. या सोहळ्यात त्याचा रुबाबदार अंदाज पाहायला मिळाला.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या वेडिंग सोहळ्यातील सलमानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अंबानी कुटुंबीयांकडून सलमान खानचं ग्रँड वेलकम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सलमान अनंत आणि राधिकाला भेटत त्यांना मिठी मारतो. तर त्यांच्या आनंदातही सहभागी होतो. या व्हिडिओत तो ठुमके लगावताना आणि त्याबरोबरच ढोल वाजवतानाही दिसत आहे. अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील सलमानचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा अनंत अंबानी हा धाकटा लेक आहे. अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्याचीदेखील बरीच चर्चा रंगली होती. आता १२ जुलैला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. तर १३ जुलैला त्यांचा आशीर्वाद सेरेमनी आणि १४ जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शन असणार आहे.