अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्यासोबत सलमानने दिल्या पोझ?, व्हायरल फोटोमागचं हे आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 04:14 PM2024-07-15T16:14:47+5:302024-07-15T16:15:37+5:30

Salman Khan -Aishwarya Rai Bachchan : सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तो पाहून लोक अवाक् झाले आहेत.

Salman Khan posed with Aishwarya Rai Bachchan at Anant-Radhika's wedding?, This is the truth behind the viral photo | अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्यासोबत सलमानने दिल्या पोझ?, व्हायरल फोटोमागचं हे आहे सत्य

अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्यासोबत सलमानने दिल्या पोझ?, व्हायरल फोटोमागचं हे आहे सत्य

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी(Anant Ambani)चे बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंट(Radhika Marchant)सोबत १२ जुलै रोजी लग्न झाले. या भव्य लग्नात जगातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. गेल्या शुक्रवारी झालेल्या लग्नात सहभागी झालेल्या अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, संजय दत्त, अनिल कपूर, रणवीर सिंग, आलिया भट, रणबीर कपूर यांच्यासह सर्व स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात सलमान खान त्याची बहीण अर्पिता खानसोबत पोहोचला होता आणि दोघांनी एकत्र पोज दिली. त्याचवेळी ऐश्वर्या राय बच्चन तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसली. दरम्यान, एक फोटो व्हायरल होत आहे जो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. वास्तविक, या फोटोमध्ये सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) एकत्र पोज देताना दिसत आहेत. या फोटोचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. वास्तविक, या फोटोमध्ये सलमान खान त्याची बहीण अर्पिता खानसोबत आहे, तर ऐश्वर्या राय बच्चन अभिनेत्याचा हात धरताना दिसत आहे. या फोटोचे सत्य समोर आले असून फोटोची छेडछाड झाल्याचे सांगण्यात आले. एआयच्या मदतीने दोन फोटो एकत्र करून एक फोटो तयार केला आहे. अशाप्रकारे सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चनसोबतचा फोटो खोटा आहे. हा फोटो शेअर करताना प्रयाग तिवारी नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिले की, 'AI खरंच खूप धोकादायक आहे.'

एकेकाळी सलमान-ऐश्वर्या होते रिलेशनशीपमध्ये
सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन एकेकाळी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले. आता सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन एकत्र दिसत नाहीत, त्यामुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातील दोघांचा व्हायरल होणारा फोटो पाहून लोकांना आश्चर्य वाटले. मात्र, सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा हा फोटो एडिट झाला आहे. 

Web Title: Salman Khan posed with Aishwarya Rai Bachchan at Anant-Radhika's wedding?, This is the truth behind the viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.