भाईजानने केलं आमिर खानच्या मुलीचं कौतुक; म्हणाला - 'कमाल आहे यार, मुलं मोठी झाली...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 17:53 IST2023-10-05T17:46:57+5:302023-10-05T17:53:08+5:30
आयरा खानचं मानसिक आरोग्यावरील जनजागृतीचे काम पाहून सलमान खाननं तिचं कौतुक केलं आहे.

Salman Khan praise on Aamir Khan’s daughter Ira Khan
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणारे आमिर खानची मुलगी आयरा खान कायमचं चर्चेत असते. आयरा ही सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे आणि सोशल मीडियावर तिचे खूप मोठे चाहते आहेत. आयराने आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. एवढंच नव्हे तर ती डिप्रेशनमध्येही गेली होती. या मानसिक विकाराशी लढा दिल्यानंतर आता आयरा मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करताना दिसते. आयरा खानचं मानसिक आरोग्यावरील जनजागृतीचे काम पाहून सलमान खाननं तिचं कौतुक केलं आहे.
आयराचे काम पाहून सलमान खान प्रभावित झाला. सलमानने सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत तिच्या कामाचे कौतुक केले. सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहलं की, 'कमाल आहे यार किती लवकर मुलं मोठी झाली. शिवाय, मजबूत आणि खूप हुशारही झाली आहेत. मला हे फार आवडलं, बाळा तुला खूप आशिर्वाद'.
आयरा ही मानसिक तणाव आणि नैराश्याबद्दल कायम मोकळेपणाने बोलते. एका मुलाखतीत आयरा डिप्रेशनबद्दल बोलताना दिसली. नैराश्य किंवा डिप्रेशन येण्यामागे कोणतेही एक कारण नसते. ज्या गोष्टींच्या अवतीभवती, ज्या वातावरणा तुम्ही वाढलात त्यातूनच तुमचे व्यक्तिमत्व घडत असते. त्यामुळेच मी ज्या कुटुंबात वाढले, त्याचा माझ्या मानसिक स्थितीवर काहीही परिणाम झाला नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल.
आयरा ही आमिर व त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी असून तिला जुनैद हा छोटा भाऊही आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा नुपूर शिखरे याच्यासोबत साखरपुडा झाला. त्या समारंभाचे फोटोही बरेच व्हायरल झाले होते. भिनेता असणाऱ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी, आयराने दिग्दर्शक म्हणून कॅमेऱ्याच्या मागे स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे.