पठाण 'जवान' झाला! भाईजानने केलं शाहरुखच्या सिनेमाचं कौतुक, म्हणाला, 'मी पहिल्याच दिवशी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:08 AM2023-07-12T10:08:16+5:302023-07-12T10:08:58+5:30

'जवान' सिनेमाचा प्रीव्ह्यू शाहरुखचा जिग्गी यार सलमान खानलाही पसंतीस पडलाय.

salman khan praises shahrukh khan jawan prevue says i will watch it on first day only | पठाण 'जवान' झाला! भाईजानने केलं शाहरुखच्या सिनेमाचं कौतुक, म्हणाला, 'मी पहिल्याच दिवशी...'

पठाण 'जवान' झाला! भाईजानने केलं शाहरुखच्या सिनेमाचं कौतुक, म्हणाला, 'मी पहिल्याच दिवशी...'

googlenewsNext

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'जवान' (Jawan) सिनेमाचा दमदार प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला. जबरदस्त अ‍ॅक्शन, व्हीएफएक्स आणि डायलॉग्समुळे सिनेमाचा प्रीव्ह्यू प्रेक्षकांच्या पसंतीस पडलाय. 'पठाण' सिनेमातून शाहरुखने ४ वर्षांनी कमबॅक केले आणि आता 'जवान' मधून तो आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट द्यायला सज्ज झाला आहे. 'जवान' सिनेमाचा प्रीव्ह्यू शाहरुखचा जिग्गी यार सलमान खानलाही (Salman Khan) पसंतीस पडलाय. सलमानने शाहरुखसाठी खास ट्वीट केलं आहे.

सलमान आणि शाहरुखची मैत्री सगळ्यांनाच ठाऊक आहे. दोघंही एकमेकांच्या मदतीला धावून येतात. एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. भाईजानला 'जवान'चा प्रीव्ह्यू भलताच पसंतीस पडलाय. इतकंच नाही तर त्याने शाहरुखसाठी ट्वीटही केलं आहे. त्याने लिहिले, 'पठाण जवान झाला. अप्रतिम ट्रेलर, खूप आवडलं. हा सिनेमा आहे जो चित्रपटगृहात जाऊनच पाहिला पाहिजे. मी तर पहिल्याच दिवशी बघायला जाणार. मजा आली वाह!'

सलमान खानने शाहरुखच्या 'पठाण' सिनेमात कॅमिओ केला होता. तर आता सलमानच्या 'टायगर 3' मध्ये शाहरुख खान कॅमिओ करणार आहे. सध्या दोन्ही खान एकत्र आल्याने चाहतेही खूश आहेत. पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये 'खान'चा जलवा बघायला मिळणार असं चित्र आहे. 

'जवान' 7 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. साऊथचा सुपरहिट दिग्दर्शक अ‍ॅटलीने जवानच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सिनेमात नयनतारा, प्रियामणी आणि विजय सेतुपति हे साऊथ कलाकार आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणचा स्पेशल अ‍ॅपिअरन्स असणार आहे.

Web Title: salman khan praises shahrukh khan jawan prevue says i will watch it on first day only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.