Ind VS Pak मॅचमध्ये 'टायगर' ची एन्ट्री, 'किंग कोहली'बद्दल काय म्हणाला सलमान खान?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:41 PM2023-10-14T14:41:07+5:302023-10-14T15:36:42+5:30

अभिनेता सलमान खानही आगामी 'टायगर 3'चं प्रमोशन करण्यासाठी पोहोचला आहे.

Salman khan promotes tiger 3 during India vs Pakistan match says virat kohli is a dabangg player | Ind VS Pak मॅचमध्ये 'टायगर' ची एन्ट्री, 'किंग कोहली'बद्दल काय म्हणाला सलमान खान?

Ind VS Pak मॅचमध्ये 'टायगर' ची एन्ट्री, 'किंग कोहली'बद्दल काय म्हणाला सलमान खान?

Tiger 3:  World Cup सुरु झाल्यानंतर आज क्रिकेटरसिकांसाठी महत्वाचा दिवस आहे. कारण आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगत आहे. ज्या सामन्याकडे दोन्ही देशांचं लक्ष लागलेलं असतं. या सामन्याचा लाईव्ह अनुभव घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अहमदाबादला पोहोचले आहेत. दरम्यान अभिनेता सलमान खानही (Salman Khan) आगामी 'टायगर 3'चं प्रमोशन करण्यासाठी पोहोचला आहे. यावेळी किंग कोहलीचा (Virat Kohli) विषय निघताच सलमान खान काय म्हणाला बघा.

'टायगर 3' सिनेमाच्या प्रमोशनसाठी YRF ने Star sports सोबत डील केली आहे. याची सुरुवात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापासून होत आहे. सलमान खानने स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये एन्ट्री घेतली. यावेळी त्याने आजच्या मॅचवर प्रतिक्रिया दिली. तसंच विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीबद्दलही तो बोलताना दिसला.

स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओत गप्पा मारत असताना विराट कोहलीचा विषय निघाला. जेव्हा पाकिस्तानला धोबीपछाड करण्याची वेळ येते तेव्हा विराटशिवाय कोणी चांगला खेळाडू नाही. त्यावर सलमान म्हणाला, 'नक्कीच, तो तर देशाचा दबंग प्लेयर आहे.'

याशिवाय भारत-पाकिस्तान मॅच असताना खेळाडूंवर दबाव असतो त्यावर सलमान म्हणाला,'दबाव तर असेलच. पण तुम्ही जा आणि स्टेडियमच्या बाहेर मारा. पूर्ण आत्मविश्वासाने खेळा.'

आज भारत पाकिस्तान महत्वपूर्ण सामन्यात सलमान खानने 'टायगर 3' चं  जोरदार प्रमोशन केलं. हा सिनेमा आतापर्यंतचा yrf चा सर्वोत्तम सिनेमा असेल असंही तो यावेळी म्हणाला.

Web Title: Salman khan promotes tiger 3 during India vs Pakistan match says virat kohli is a dabangg player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.