जिंकलंस रे भावा! लॉकडाऊनमध्ये सलमान खान घेतोय पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कसची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:50 PM2021-04-23T12:50:26+5:302021-04-23T12:51:26+5:30
सलमान खान बिइंग ह्युमन या संस्थेमार्फत नेहमीच गरजूंना मदत करत असतो. आता त्याची संस्था पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सची मदत करत आहे
सलमान खान एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला माणूस देखील आहे. त्याने आजवर हे सिद्ध केले आहे. आता पुन्हा एकदा पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कसच्या मदतीसाठी तो धावून आला आहे.
सलमान खान बिइंग ह्युमन या संस्थेमार्फत नेहमीच गरजूंना मदत करत असतो. आता त्याची संस्था पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सची मदत करत आहे. बिइंग हंग्री या नावाने सलमानच्या स्वयंसेवी संस्थेचा एक फूड ट्रक सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना खाण्याचे पदार्थ, चहा, पिण्याचं पाणी पुरवण्याची सेवा देत आहे. मुंबईत वांद्रे ते जुहू आणि वांद्रे ते वरळी या भागात ही गाडी अनेकवेळा फिरताना दिसून येतेय.
सलमान खान आणि राहुल कनाल हे दोघे मिळून पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कसना मदत करत असून संध्याकाळी पाच ते रात्री दहा या वेळात ही गाडी फिरत असते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील बिइंग हंग्रीने मागील वर्षी जवळपास 2 लाख नागरिकांना तांदूळ, डाळी, पीठ, तेल असे साहित्य चार महिने लोकांना वाटले होते.