'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan'साठी सलमानने घेतले 'इतके' कोटी, रामचरणनेही घेतलं तगडं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 04:16 PM2023-04-10T16:16:31+5:302023-04-10T16:19:50+5:30
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Starcast Fees: दबंग सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे.
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Starcast Fees: बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. व्यंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपति बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग असे अनेक बडे बडे स्टार्स या सिनेमात आहेत. साऊथ सुपरस्टार रामचरण या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये आहेत. या सर्व कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं माहितेय?
सलमान खान या चित्रपटात एका हटके लुकमध्ये दिसणार आहे. लांब केसांमध्ये त्याचा लुक सध्या जाम चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमानने या चित्रपटासाठी कथितरित्या ५० कोटी रूपये मानधन घेतलं आहे.
साऊथ सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबाती हा ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सलमानसोबत त्याला पाहण्यासाठी चाहते सुपर एक्ससाईटेड आहेत. रिपोर्टनुसार, व्यंकटेश या चित्रपटात सलमानच्या भावाच्या भूमिकेत आहे आणि या भूमिकेसाठी त्याने ८ कोटी रूपये चार्ज केले आहेत.
सलमानच्या अपोझिट दिसणारी पूजा हेगडे हिने या चित्रपटासाठी ५ कोटी रुपये घेतल्याचं कळतंय. तर कॅमिओ रोलमध्ये दिसणार असलेल्या रामचरणने ३ कोटी रूपये वसूल केले आहेत.
सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या शहनाज गिलने ५५ लाख रुपये मानधन घेतले आहे. ता पंजाबी सिंगर व अभिनेता जस्सी गिलने सलमानच्या या चित्रपटासाठी ७० लाख रुपये फी घेतली आहे. फरहाद सामजी यांनी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सलमानच्या इतर अनेक चित्रपटांप्रमाणेच हा ॲक्शन पट आहे. याशिवाय कॉमेडी, नाट्यमय घटना, रोमान्स आणि इमोशनचा तडकाही आहे.