सलमान खानच्या 'सिंकदर'मध्ये 'या' सुपरस्टारचा कॅमिओ, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 18:08 IST2025-03-30T18:08:01+5:302025-03-30T18:08:24+5:30
'सिकंदर' चित्रपटातील एका खास कॅमिओची माहिती समोर येत आहे.

सलमान खानच्या 'सिंकदर'मध्ये 'या' सुपरस्टारचा कॅमिओ, कोण आहे तो?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा 'सिकंदर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. या सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सलमानचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचत आहेत. चित्रपटातील एका खास कॅमिओची माहिती समोर येत आहे.
'सिकंदर'मध्ये सलमान आणि रश्मिका यांच्याशिवाय सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन अशी स्टारकास्ट आहे. यासोबतच सिनेमात एक खास कॅमिओदेखील आहे. 'सिकंदर'चित्रपटाच्या माध्यमातून हा अभिनेता बऱ्याच काळानंतर पडद्यावर दिसला आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कुणी नाही तर संजय कपूर आहे. संजय कपूरने 'सिकंदर'मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली आहे. यापूर्वी अभिनेता 'मर्डर मुबारक' चित्रपटात दिसला होता.
ए.आर. मुरुगादोस दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसली आहे. दरम्यान, हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. पायरसी कंटेट देणाऱ्या वेबसाइटवर 'सिकंदर' चित्रपट दाखवला जात आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, तमिळरॉकर्स, इबोम्मा, मुव्हीरुल्झ, फिल्मीझिला, तमिळब्लास्टर्स आणि टेलिग्राम ग्रुप सारख्या प्लॅटफॉर्मवर मोफत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. साजिद नाडियाडवाला यांच्या चित्रपटाला हा मोठा धक्का मानला जातोय, कारण बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई होत असताना अशाप्रकारे ऑनलाइन लीक झाल्याचा फटका सिनेमाच्या कमाईवर होऊ शकतो.