सलमान खान 'ह्या' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहचला माल्टामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 04:18 PM2018-08-11T16:18:10+5:302018-08-11T16:20:31+5:30

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' हा चित्रपट ‘ओड टू माई फादर’चा आॅफिशिअल हिंदी रिमेक आहे.

Salman Khan reached malta for Bharat shooting | सलमान खान 'ह्या' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहचला माल्टामध्ये

सलमान खान 'ह्या' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पोहचला माल्टामध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देजॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेतसलमानसोबत दिसणार कतरिना कैफ

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट 'भारत' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी माल्टामध्ये पोहचला आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरने मुंबईतील भारत चित्रपटातील दोन अॅक्शन सीक्वेंस चित्रीत झाल्याचे सांगितले होते. आता मुंबईतील शेड्युल पूर्ण झाल्यानंतर सलमानने माल्टामधील शूटिंगला सुरूवात केली आहे. सलमानने माल्टामध्ये गेल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. त्याने फोटो शेअर करून लिहिले की,'सुंदर देश माल्टामध्ये 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली.'

'भारत' चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करीत असून त्यांनी चित्रीकरणाबद्दल आधी माहिती दिली होती. त्यांनी लिहिले होते की, ''भारत' चित्रपटातील दोन ड्रामा अॅक्शन सीक्वेंसचे मुंबईत चित्रीकरण पार पडले आहे आणि आता माल्टाच्या तयारीला सुरूवात केली आहे.' त्यानंतर नुकतेच सलमानने सोशल मीडियावर माल्टा देशाला सुंदर देश असे संबोधून तिथे चित्रीकरणाला सुरूवात केल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.



 

या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार आहे. तसेच दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २०१४ साली प्रद्रशित झालेला दक्षिण कोरियाई चित्रपट 'ओड टू माई फादर'मधून प्रेरणा घेऊन भारत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे. यापूर्वी सलमान व जॅकी ‘वीर’मध्ये एकत्र दिसले होते. 
'भारत' चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. हा सिनेमा २०१९ला ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Salman Khan reached malta for Bharat shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.