कौटुंबिक वाद विसरुन सलमान खान पोहोचला मलायकाच्या घरी, नेटकरी म्हणतात- कुटुंब असावं तर असं...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 09:40 AM2024-09-13T09:40:01+5:302024-09-13T09:41:23+5:30

मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचं निधन झालं. त्यानंतर सलमान खान तिचं सांत्वन करायला तिच्या घरी गेला (malaika arora)

Salman Khan reaches Malaika arora house after his father anil kuldeep mehta death | कौटुंबिक वाद विसरुन सलमान खान पोहोचला मलायकाच्या घरी, नेटकरी म्हणतात- कुटुंब असावं तर असं...

कौटुंबिक वाद विसरुन सलमान खान पोहोचला मलायकाच्या घरी, नेटकरी म्हणतात- कुटुंब असावं तर असं...

बॉलिवूडमध्ये काल एका बातमीने सर्वांना मोठा धक्का बसला. मलायका अरोराच्या सावत्र वडिलांनी बिल्डिंगवरुन उडी मारुन स्वतःचं आयुष्य संपवलं. मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबाला या दुःखद गोष्टीमुळे मोठा धक्का बसला आहे. या दुःखद काळात मलायकाला धीर द्यायला आणि तिचं सांत्वन करायला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तिच्या घरी गेले होते. अशातच अभिनेता सलमान खानही काल रात्री मलायकाला भेटायला तिच्या घरी गेला होता.

रुसवे फुगवे विसरुन सलमान खान पोहोचला मलायकाच्या घरी

काल रात्री उशीरा सलमान मलायकाच्या घराजवळ स्पॉट झाला. गाडीतून उतरुन सलमान मलायकाच्या घरी जाताना दिसला. सलमानच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट झळकत होतं. २०१७ ला मलायकाने सलमानचा भाऊ अरबाज खानपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर सलमानने कधीही जाहीरपणे मलायकाचा उल्लेख केला नव्हता. परंतु मलायकाच्या वडिलांचं निधन झाल्याचं कळताच कौटुंबिक वाद विसरुन मलायकाला भेटायला पोहोचला. त्यामुळे नेटकऱ्यांनी सलमान आणि संपूर्ण खान कुटुंबाचं कौतुक केलंय. 'कुटुंब असावं तर असं' असं म्हणत सलमान खानचं कौतुक करण्यात आलंय.



संपूर्ण खान कुटुंब मलायकाच्या पाठीशी

मलायकाने अरबाजपासून घटस्फोट घेतल्यावर खान कुटुंबापैकी कोणीही मलायकाला भेटलं नव्हतं. परंतु या दुःखद समयी मलायकाला धीर द्यायला संपूर्ण खान कुटुंब एकत्र आलं. सलमान खानसोबतच अरबाज आणि सोहेल सुद्धा मलायकाच्या घरी तिची भेट घ्यायला गेले होते.  मलायकाचे वडील अनिल कुलदीप मेहता यांनी बांद्रा येथील राहत्या घरावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मलायका ११ वर्षांची असतानाच जॉयस आणि त्यांच्या पतीचा घटस्फोट झाला होता. अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील होते. मलायकाचा सावत्र वडिलांशीही चांगला बाँड होता. 

Web Title: Salman Khan reaches Malaika arora house after his father anil kuldeep mehta death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.