"अगली बार झटका ही देखने को मिलेगा..."; अभिनेता सलमान खानला धमकीचा इ-मेल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 11:25 PM2023-03-19T23:25:35+5:302023-03-19T23:26:20+5:30
Salman Khan, Death threat: सलमानच्या मुंबईतील घराबाहेरच्या सुरक्षेत वाढ
Salman Khan Received Death Threat E-mail: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीनंतर सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लॉरेन्सने अभिनेता सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यातच आता सलमानला धमकीचा ई-मेल आल्याची बातमी मिळत आहे. त्यासंदर्भात पोलिसांनी तक्रार नोंदवली असून मुंबईतील त्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचेही सांगितले जात आहे.
ANI च्या म्हणण्यानुसार, सलमान खानला धमकीचा ई-मेल आला होता. त्या संदर्भात वांद्रे पोलिसांनी भादंविच्या कलम 506(2), 120(बी) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि घराबाहेर सुरक्षा देखील वाढवली आहे. या आधी शनिवारी पोलिसांनी सलमान खानच्या ऑफिसला ई-मेल पाठवल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गँगस्टर्सविरोधात गुन्हा दाखल केला होता.
Mumbai Police beefs up security outside actor Salman Khan's house after he received threats by email, Bandra Police registered a case under sections 506(2),120(b) & 34 of IPC.
— ANI (@ANI) March 19, 2023
Earlier on Saturday, Mumbai Police booked jailed gangsters Lawrence Bishnoi, Goldie Brar & Rohit Garg… https://t.co/XujH67eTbC
ई-मेलमध्ये काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोल्डी ब्रारचा सहकारी रोहितने सांगितले आहे की सलमानने लॉरेन्सची मुलाखत पाहिली असेल आणि जर त्याने ती पाहिली नसेल तर त्याने ती नक्की पाहावी. हे प्रकरण संपवण्यासाठी गोल्डीला सलमान खानला भेटायचे आहे, असेही सांगण्यात आले. रोहितने मेलमध्ये असेही लिहिले आहे की, “समय रहते बता दिया, अगली बार झटका ही देखने को मिलेगा.”
सलमान खानने माफी मागावी - लॉरेन्स
तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. काळवीट प्रकरणाबाबत लॉरेन्सने सांगितले होते की, त्यांच्या परिसरात कोणत्याही प्राण्यांची हत्या होत नाही, तेथे झाडे तोडली जात नाहीत आणि बिश्नोई लोकांची संख्या जिथे होती तिथे सलमानने शिकार केली. लॉरेन्सने सलमानला येऊन माफी मागायला सांगितली आहे. सलमानने हे केले नाही तर त्याचा अहंकार कसा संपवायचा ते पाहिले जाईल, असेही लॉरेन्सच्या वतीने सांगण्यात आले. त्याचवेळी, अभिनेत्याला धमकीचा मेल आल्याची बातमी आल्याने सलमान पुन्हा चर्चेत आला आहे.
सलमान चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त
धमकीच्या मेलच्या पलीकडे, जर आपण सलमान खानच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोललो, तर तो शाहरुख खानच्या पठाणमध्ये खास कॅमिओ भूमिकेत दिसला आहे. दुसरीकडे, २१ एप्रिल रोजी त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. त्याच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. तसेच त्याच्या टायगर 3 या चित्रपटाचीही बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे, जो वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे.