भाईजानचा घसरला भाव; 'या' कारणामुळे करावी लागली मानधनात मोठी कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 12:04 PM2021-12-01T12:04:33+5:302021-12-01T12:05:28+5:30

Salman khan: सलमान एका चित्रपटासाठी तब्बल १५० कोटी रुपये मानधन घेतो. परंतु, आता त्याने त्याच्या मानधनात १५ टक्क्यांची घट केली आहे.

salman khan reduces his fees for next movie kabhi eid kabhi diwali | भाईजानचा घसरला भाव; 'या' कारणामुळे करावी लागली मानधनात मोठी कपात

भाईजानचा घसरला भाव; 'या' कारणामुळे करावी लागली मानधनात मोठी कपात

googlenewsNext

गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता म्हणजे सलमान खान (salman khan). १९८८ मध्ये कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या सलमानने 'बॉडीगार्ड', 'वाँडेट', 'हम साथ साथ हैं', 'हम आपके हैं कौन' असे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. उत्तम अभिनय आणि फिटनेसमुळे सलमानची लोकप्रियता केवळ देशापूरती मर्यादित न राहता पार सातासमुद्रापारपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच सलमानला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते यांच्या रांगा लागलेल्या असतात. विशेष म्हणजे सलमान त्याच्या एका चित्रपटासाठी अफाट मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं. मात्र, सध्या सोशल मीडियावर सलमानच्या मानधनाची चर्चा रंगली आहे. सलमानच्या मानधनात घट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सलमानची मुख्य भूमिका असलेला अंतिम: द फायनल ट्रुथ हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता त्याचा आगामी कभी ईद कभी दिवाली हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. मात्र, यामध्येच सलमानने त्याच्या मानधनात घट केल्याचं सांगण्यात येत आहे. 

सलमानने केली मानधनात घट

साजिद नाडियावाल यांच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण जानेवारीपासून सुरु होणार आहे. या चित्रपटासाठी सलमानने मानधनात घट केली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात सर्व क्षेत्रांप्रमाणेच कलाविश्वालाही चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे सलमानने मानधनात घट करावी अशी विनंती साजिद नाडियावाल यांनी केली होती. या विनंतीचा मान ठेवत सलमानने त्याच्या मानधनात घट केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानने त्याच्या मानधनात १५ टक्के घट केली आहे त्यानुसार, आता सलमान १२५ कोटी रुपये मानधन घेणार आहे.

दरम्यान, कोविड महामारीपूर्वी सलमान त्याच्या चित्रपटांसाठी १५० कोटी रुपये मानधन घेत होता. सलमानचा कभी ईद कभी दिवाली हा चित्रपट प्रथम २०२१ मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु, कोविड संकटामुळे हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद समजी यांनी केलं आहे. तर, निर्मिती साजिद नाडियावाला यांनी केलं आहे.

Web Title: salman khan reduces his fees for next movie kabhi eid kabhi diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.