ज्या मुलीवर सलमान खान करायचा जीवापाड प्रेम, ती आज बनलीय आजी, जवळच्या मित्रानेच केली होती पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 01:45 PM2021-01-18T13:45:33+5:302021-01-18T13:49:44+5:30
संगीता बिजलानीसह सलमानचे लग्न ठरले होते. लग्नाच्या आमंत्रण पत्रिका देखील छापल्या गेल्या होत्या. पण काही कारणास्तव हे लग्न होऊ शकले नाही.
बॉलीवुडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान. गेल्या अनेक वर्षांपासून सलमानच्या लग्नाच्या चर्चा आहेत. आजवर सलमानचे विविध अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. त्याच्या लग्नाचा विषय निघताच अनेक अभिनेत्रींची नावं चर्चेत असतात. अखेर जास्त चर्चा व्हायला लागल्या त्यामुळे खुद्द सलमाननेच लग्नाचा विचार नसल्याचे जाहीर केले आणि त्या विषयावर कायमचा पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. काही ना काही कारणामुळे सलमाच्या लग्नाची चर्चा रंगत असते. जेव्हा जेव्हा सलमानला मनापासून कोणती मुलगी आवडायची त्याच्यासह त्याचे लग्न करण्याचेही प्लॅनिंग असायचे. मात्र काहीही केले तरी सलमानच्या प्रेमाची कहानी अधुरीच राहिली.
'बिग बॉस सीझन 13' मध्ये अजय देवगण आणि काजोल जेव्हा त्यांच्या 'तन्हाजी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. अजयनेच सलमानचे एक गुपित सांगितले होते. पहिल्यांदाच नॅशनल टीव्हीवर सलमानचे हे गुपित जगासमोर आले होते. मुळात सलमानचे इंडस्ट्रीत एंट्री करण्यापूर्वी एका मुलीवर प्रेम होते. त्याचवेळी दोघांनी लग्न केले असते तर. आतापर्यंत सलमान त्याच्याही मुलांचा आजोबा बनला असता. हे सांगताच उपस्थितत सगळे हसून -हसून लोटपोट झाले होते.
कारण ती मुलगी जेव्हा सलमानला परत भेटली तेव्हा सलमानला कळाले की, ती आज आजी बनली आहे. तिला नातवंड आहेत. नातवंड सलमानचीही खूप मोठे फॅन्स आहेत. मुळात सलमानने त्या मुलीला कधीच प्रपोज केले नव्हते. पण तिच्यावर प्रेमही होते. सलमान म्हणतो बरं झाले मी तेव्हा तिला प्रपोज केले नाही. नाही तर आज मी ही आजोबा बनलो असतो.
असे म्हटले जाते की संगीता बिजलानीसह सलमानचे लग्न ठरले होते. लग्नाच्या आमंत्रण पत्रिका देखील छापल्या गेल्या होत्या. पण काही कारणास्तव हे लग्न होऊ शकले नाही. याशिवाय सलमान खानचे नाव ऐश्वर्यासह जोडले गेले होते. दोघांच्या अफेअरची चर्चा आजही रंगत असते. या दोघांची लव्हस्टोरी जगजाहीर आहे. ऐश्वर्यानंतर सलमानेही कधीच लग्नाचा विचार केला नाही. ऐश्वर्या नंतर कैटरीना कैफ आणि लूलिया वंटुरसह त्याच्या लग्नाच्या चर्चा झाल्या, पण त्याही केवळ चर्चाच ठरल्या.