सलमान खानचा या अभिनेत्याच्या सांगण्यावरुन 'गजनी'मधून झालेला पत्ता कट, भाईजान म्हणाला - भेटेन तेव्हा विचारेन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:24 IST2025-03-27T11:23:32+5:302025-03-27T11:24:32+5:30
सलमान खान (Salman Khan) सध्या सिकंदर चित्रपटामुळे (Sikandar Movie) चर्चेत आहे. हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सलमान खानचा या अभिनेत्याच्या सांगण्यावरुन 'गजनी'मधून झालेला पत्ता कट, भाईजान म्हणाला - भेटेन तेव्हा विचारेन...
सलमान खान (Salman Khan) सध्या सिकंदर चित्रपटामुळे (Sikandar Movie) चर्चेत आहे. हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादॉस यांनी केलंय. ज्यांनी १७ वर्षांपूर्वी आमिर खान(Aamir Khan)सोबत 'गजनी' सिनेमा बनवला होता. त्यावेळी अशी चर्चा रंगली होती की, मुरुगादॉस गजनीमध्ये आमिरच्या जागी सलमानला कास्ट करण्याचा विचार करत होते. आता १७ वर्षांनी या वृत्तांवर भाईजानने मौन सोडले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सलमान खानला विचारण्यात आले की, खरंच गजनीमध्ये मुख्य भूमिकेसाठी भाईजानला कास्ट करण्याचाही विचार करण्यात आला होता का? यावर सलमान म्हणााला, हो मी ऐकलंय आणि हे मी प्रदीपकडून ऐकलंय. प्रेमाने आम्ही त्याला गजनी बोलतो.
प्रदीप रावत आणि 'गजनी'बद्दल सलमान म्हणाला...
सलमान खान पुढे म्हणाला, 'तो माझा मित्र आहे, आम्ही चार-पाच चित्रपट एकत्र केले आहेत. मला वाटते की त्याने याबद्दल सांगितले असेल. मग तो असेही म्हणाला की मुरुगदास इतका शिस्तप्रिय, इतका प्रामाणिक आहे, सलमान कसा काम करेल? सलमानला खूप राग येतो.
'विचारेन त्याला मी कधी तुझ्यावर रागोवलंय?'
सलमान पुन्हा म्हणाला, 'मी म्हणालो ते ठीक आहे. त्यानंतर कधीही (प्रदीप रावत) भेटलो नाही. तुला भेटल्यावर मी नक्की विचारेन, भाई, मी तुझ्यावर कधी रागावलो होतो?
'सिकंदर'ची स्टारकास्ट
'सिकंदर'बद्दल बोलायचे झाले तर, यात सलमानशिवाय रश्मिका मंदाना, सत्यराज, शर्मन जोशी, नवाब शाह, सुनील शेट्टी आणि प्रतीक बब्बर यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.