'हो. मी कमिटेड आहे'; Katrina Kaif च्या लग्नानंतर Salman khan ने सांगितलं त्याचं रिलेशनशीप स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 07:32 PM2022-01-30T19:32:47+5:302022-01-30T19:33:52+5:30

Salman khan: सलमान नेमकं लग्न कधी करणार हा प्रश्न कायमच अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर सलमानने बिग बॉस 15च्या मंचावर दिलं आहे.

salman khan reveals his relationship status on national television bigg boss 15 grand finale | 'हो. मी कमिटेड आहे'; Katrina Kaif च्या लग्नानंतर Salman khan ने सांगितलं त्याचं रिलेशनशीप स्टेटस

'हो. मी कमिटेड आहे'; Katrina Kaif च्या लग्नानंतर Salman khan ने सांगितलं त्याचं रिलेशनशीप स्टेटस

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे (salman khan) बॉक्स ऑफिसवर जितके चित्रपट गाजले तितकीच त्याची लव्हलाइफही चर्चेत राहिली आहे. आतापर्यंत कालाविश्वातील अनेक अभिनेत्रींसोबत सलमानचं नाव जोडलं गेलं आहे. ऐश्वर्या रायपासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत सलमानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, सलमान नेमकं लग्न कधी करणार हा प्रश्न कायमच अनेकांना पडतो. तसंच सलमान खरंच कोणासोबत कमिटेड आहे का असा ही प्रश्न नेटकऱ्यांना पडत असतो. या प्रश्नाचं उत्तर सलमानने बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या मंचावर दिलं आहे.

बिग बॉस15 (Bigg Boss 15) चा ग्रँड फिनाले सोहळा सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामध्येच काल (२९ जानेवारी) झालेल्या भागात बिग बॉस १३ ची एक्स स्पर्धक शहनाज गिलने हजेरी लावली होती. यावेळी तिच्याशी बोलत असताना सलमानने त्याच्या लव्हलाइफविषयी खुलासा केला.

सध्या सोशल मीडियावर शहनाज गिल आणि सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शहनाज मुद्दाम सलमानची मस्करी करत आहे. "मी आता पंजाबच्या कॅटरिना कैफपासून ते इंडियाची शहनाज गिल झाले आहे. कारण, कॅटरिना कैफ तर आता पंजाबची कॅटरिना झाली आहे", असं शहनाज म्हणते.

शहनाजचं हे वाक्य ऐकल्यावर सलमानने तिला म्हणतो, "सगळं असंच राहू दे. तिचं लग्न विकी कौशलसोबत झालंय. चांगली गोष्ट आहे", असं म्हणतो, त्यावर "सर, तुम्ही फक्त खुश रहा", असं ती म्हणते. त्यानंतर, "सर मी जास्त तर बोलत नाहीये ना?" त्यावर, "मी ठीक आहे आणि लवकरच अजून ठीक होईन". त्यावर शहनाज विचारते "सर, तुम्ही कमिटेड आहात?" यावर "हो" असं उत्तर सलमान देतो.

दरम्यान, सलमान आणि शहनाजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसंच सलमान नेमका कोणासोबत कमिटेड आहे असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
 

Web Title: salman khan reveals his relationship status on national television bigg boss 15 grand finale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.