Salman Khan Marriage: लग्नाच्या प्रश्नावर सलमान खानचं शॉकिंग उत्तर, चाहतीने प्रपोज केल्यावर भाईजान म्हणाला....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 11:36 AM2024-02-07T11:36:05+5:302024-02-07T11:36:22+5:30
Salman Khan Marriage: या उत्तरानंतर सलमान खान आता लग्न करेल या आशाच मावळल्या आहेत. Video व्हायरल
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) बीटाऊनचा मोस्ट बॅचलर अभिनेता आहे. तसंच तो हँडसम अभिनेत्यांपैकी एक आहे. 90 च्या दशकापासूनच तो तरुणींच्या गळ्यात ताईत बनला. तरी सलमान खान आजही अविवाहित आहे. त्याचं वैयक्तिक आयुष्य काही लपून राहिलेलं नाही. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. एकवेळ तर अशी होती की त्याचं लग्नही ठरलं होतं. मात्र अभिनेत्रीने लग्नाआधी नकार दिला. भाईजानने नुकतंच लग्नाच्या प्रश्नावर शॉकिंग उत्तर दिलं आहे. त्याच्या उत्तरानंतर सलमान खान आता लग्न करेल या आशाच मावळल्या आहेत.
58 वर्षीय सलमान खान लग्न कधी करणार? हा एक युनिव्हर्सल प्रश्नच होता. त्याला आजही तो जिथे जाईल तिथे हा प्रश्न विचारण्यात येतो. आता अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एक चाहती त्याला थेट प्रपोज करते. ती म्हणते, 'मी हॉलिवूडवरुन आले आहे. तुला जेव्हापासून पाहिलंय मी तुझ्या प्रेमात पडले आहे. माझ्याशी लग्न करशील का?' तिच्या या प्रश्नावर आधी सलमान विचारतो, 'तू शाहरुख खानबद्दल बोलतीये का? ' नंतर म्हणतो, "माझं लग्न करण्याचं वय आता उलटून गेलं आहे. तू मला 20 वर्षांपूर्वीच भेटायला हवी होतीस." सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने व्हिडिओ इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
भाईजान त्या मुलीचं प्रपोजल अगदी नम्रपणे रिजेक्ट करतो. मध्यंतरी सलमान मॉडेल लुलिया वंतुरला डेट करत होता. मात्र नंतर त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या. काही दिवसांपूर्वीच सलमानच्या आयुष्यात त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची पुन्हा एन्ट्री झाली. संगीतासोबतच सलमान खानचं लग्न ठरलं होतं. त्यामुळे दोघं परत सोबत आले आहेत का असा प्रश्न चाहत्यांना पडला. मात्र तसंही झालेलं दिसत नाही. सलमान खान आणि कतरिना कैफही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र हेही नातं पुढे जाऊ शकलं नाही. तसंच सलमान आणि ऐश्वर्याचं नातं जगजाहीर होतं. आता भाईजानने लग्नाच्या प्रश्नावरच पूर्णविराम लावला आहे.