सलमान खानचा ॲक्शनपट 'Kick 2' कधी प्रदर्शित होणार? साजिद नाडियाडवाला यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 02:44 PM2024-07-23T14:44:12+5:302024-07-23T14:47:22+5:30

'किक 2' सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लोर येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.

Salman Khan-Sajid Nadiadwala's Action Comedy Kick 2 Go On Floors Next Year 2025 | सलमान खानचा ॲक्शनपट 'Kick 2' कधी प्रदर्शित होणार? साजिद नाडियाडवाला यांनी केला खुलासा

सलमान खानचा ॲक्शनपट 'Kick 2' कधी प्रदर्शित होणार? साजिद नाडियाडवाला यांनी केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'किक' या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं.  या चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस भूमिकेत दिसली होती. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  निर्माते लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. 

'किक 2' सिनेमा 2025 पर्यंत ऑन फ्लोर येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. सलमान खान आणि साजिद यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे आणि दोघेही 'किक 2' साठी खूप उत्सुक आहेत. सध्या सलमान खान हा 'सिकंदर' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे 'किक 2' बाबत चर्चा सुरू झाली असली तरी अजून वेळ लागू शकतो. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

'किक'बद्दल बोलताना साजिद नाडियाडवाला म्हणाले होते की, 'मी स्वत:ला किक सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून लॉन्च केलं. डिजीटल जगात अजूनही प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता आहे, सिनेमा कधी येतोय? याबाबत लोक मला प्रश्न विचारत असतात. त्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की चित्रपट कागदावर आहे आणि काम सुरू आहे'.

सुमारे 10 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'किक'मध्ये सलमान खानची देसी रॉबिन हूड स्टाइल चाहत्यांना आवडली होती. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी नकारात्मक भूमिकेत होता, मात्र चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. 'किक' हा सलमान खानच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे 100 कोटी रुपये खर्च केले होते, परंतु चित्रपटाने बंपर कमाई केली होती.

सलमान खानचा रश्मिका मंदान्नासोबतचा 'सिकंदर'  हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असेल ज्यामध्ये सलमान खान एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Salman Khan-Sajid Nadiadwala's Action Comedy Kick 2 Go On Floors Next Year 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.