सलमान आणि भन्साळीमध्ये झाला होता वाद, मधेच सोडलं होतं 'इंशाअल्लाह'चं शूटींग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 09:58 AM2023-02-11T09:58:54+5:302023-02-11T10:00:29+5:30
संजय लीला भन्साळी यांचा हा सिनेमा म्युझिकल ड्रामा होता. पण भन्साळी आणि सलमान खान यांच्यात असं काय झालं की, भाईजान शूटींगच्या मधूनच सेट सोडून निघून गेला.
सलमान खानबाबत (Salman Khan) सांगितलं जातं की, त्याला फार लवकर राग येतो. अनेकदा व्हिडीओतही हे तुम्ही पाहिलं असेल. साल 2019 मध्ये डायरेक्टर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी 'इंशाअल्लाह' सिनेमाची घोषणा केली होती. सिनेमाचं शूटींग सुरू झालं होतं. आलिया भट्टसोबत सलमान खान या सिनेमात दिसणार होता. पण हा सिनेमा अर्धवट राहिला. असं म्हणता येईल की, सिनेमा कॅन्सल झाला.
संजय लीला भन्साळी यांचा हा सिनेमा म्युझिकल ड्रामा होता. पण भन्साळी आणि सलमान खान यांच्यात असं काय झालं की, भाईजान शूटींगच्या मधूनच सेट सोडून निघून गेला. नंतर भन्साळीला आपल्या सिनेमासाठी दुसरा हिरो सापडला नाही. त्यामुळे शेवटी हा सिनेमा कॅन्सल केला.
सिनेमाचा प्रोडक्शन डिझायनर रूपिन सुचाकने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. रूपिनने सांगितलं की, 'इंशाअल्लाह' मध्ये सलमान आणि आलिया दिसणार होते. पण 2019 मध्येच सिनेमा कॅन्सल झाला. शूटींगही सुरू झालं होतं. रूपिनने सांगितलं की, हा एक मॉर्डन सिनेमा होता. पण सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. भन्साळी आणि सलमानमध्ये वाद झाला होता आणि भाईजान सेट सोडून गेले होते. दोघांनाही एकमेकांसोबत सिनेमा करायचा नव्हता. मी भन्साळी सरांसोबत मिळून वर्षभर सिनेमाचं प्लानिंग केलं होतं. लोकेशनसाठी आम्ही दोघेही तीन महिने अमेरिकेत राहिलो.
रूपिन म्हणाला की, मी सिनेमासाठी 24 सेट डिझाइन केले होते. तेही 9 महिन्यात. आम्ही तीन सेट तयारही केले होते. ज्यातील एक पूर्णपणे तयार झाला होता. आम्ही आलियासोबत शूटींग सुरूही केलं होतं. दुसरा सेट तयार होणारच होता. त्यावर शूटींग होणार होतं. पण सगळं संपलं. मी या गोष्टीला नशीबावर टाकतो. सिनेमा कॅन्सल झाला, पण मी यासोबत जुळून काही शिकलो.
निर्माते जयंतीलाल गढा यांनी बॉलिवूड हंगामासोबत बोलताना 2022 मध्ये सांगितलं होतं की, संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्या काही वाद झाला होता. ज्यामुळे सिनेमा कॅन्सल झाला. पण मला नेमकं काय झालं होतं हे माहीत नाही. त्याजागी गंगूबाई काठियावाडीचं शूटींग सुरू झालं.