सलमान खानने या सुपरहिट सिनेमातून वाचवलं होतं अक्षय कुमारचं बुडतं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 07:29 PM2024-07-29T19:29:14+5:302024-07-29T19:30:16+5:30

Salman Khan And Akshay Kumar : सलमान खान आणि अक्षय कुमारच्या या चित्रपटाला रिलीज होऊन २० वर्षे झाले आहेत.

Salman Khan saved Akshay Kumar's sinking career with this super hit movie | सलमान खानने या सुपरहिट सिनेमातून वाचवलं होतं अक्षय कुमारचं बुडतं करिअर

सलमान खानने या सुपरहिट सिनेमातून वाचवलं होतं अक्षय कुमारचं बुडतं करिअर

२० वर्षांपूर्वी एक चित्रपट रिलीज झाला होता जो रोमँटिक होता, थोडा ॲक्शन आणि भरपूर कॉमेडीने परिपूर्ण होता. या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार(Akshay Kumar)ची जोडी खूप आवडली होती आणि या चित्रपटाने अक्षय कुमारच्या करिअरही वाचवले होते. या चित्रपटाचे नाव आहे 'मुझसे शादी करोगी' (Mujhase Shadi Karogi) जो २००४ साली प्रदर्शित झाला होता आणि सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) पहिल्यांदाच एकत्र दिसले होते.

अक्षय कुमारचे यापूर्वीचे चित्रपट फ्लॉप होते मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयने अनेक हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली. सलमान खानच्या सूचनेवरून अक्षय कुमारला या चित्रपटात कास्ट करण्यात आले आणि त्यानंतर अक्षयचे चित्रपट पुन्हा रुळावर आले. ३० जुलै, २००४ रोजी, 'मुझसे शादी करोगी' हा चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली होती. या चित्रपटात सलमान खान, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, अमरीश पुरी, सुप्रिया कर्णिक, राजपाल यादव, सतीश शाह आणि कादर खान महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.

'मुझसे शादी करोगी'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात त्रिकोणी प्रेमकथा दाखवण्यात आली होती जी क्लायमॅक्समध्ये ट्विस्ट आणते. या चित्रपटात सलमान खान, प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमार यांनी अप्रतिम काम केले आहे. Sacnilk च्या मते, 'मुझसे शादी करोगी' चित्रपटाचे बजेट १९ कोटी रुपये होते, तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५५.९७ कोटी रुपये कमावले आणि त्याचा निकाल सुपरहिट ठरला.

Web Title: Salman Khan saved Akshay Kumar's sinking career with this super hit movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.