"दुबई पूर्णपणे सुरक्षित, पण भारतात अडचण", सततच्या धमक्यांवर सलमान खानचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 09:31 AM2023-05-01T09:31:51+5:302023-05-01T09:34:11+5:30

गेल्या काही दिवसांपासून दबंग अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

salman khan says he feels safe in dubai but there is problem in india amid threats | "दुबई पूर्णपणे सुरक्षित, पण भारतात अडचण", सततच्या धमक्यांवर सलमान खानचं वक्तव्य

"दुबई पूर्णपणे सुरक्षित, पण भारतात अडचण", सततच्या धमक्यांवर सलमान खानचं वक्तव्य

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून दबंग अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्याच्या सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. काळवीट शिकारप्रकरणी लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला ही धमकी दिली आहे. नुकतेच सलमान खानने दुबई सर्वात सुरक्षित असल्याचं वक्तव्य केलं आहे.

दुबईत नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सलमान म्हणाला, "दुबई तर सुरक्षित आहे पण भारतात अडचण आहे. बाकी जे व्हायचं ते होईलचं. सुरक्षेच्यादृष्टीने जे निर्देश देण्यात आले आहेत ते मी पाळतोय आणि खबरदारी बाळगतोय. आता आजुबाजुला इतकी सुरक्षा आहे की त्या बंदुकांची भीती वाटते."

'आप की अदालत' कार्यक्रमात सलमान म्हणाला,"असुरक्षितपेक्षा जास्त सुरक्षितता आहे. रस्त्यावर सायकल चालवणे, एकटंच कुठेही जाणं याहून जास्त जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये असतो तेव्हा माझ्या सुरक्षेमुळे इतरांना त्रास सहन करावा लागतो.त्यांचा लुकही असो अच्छा बेटा स्टार झाला आता. बिचाऱ्या चाहत्यांना त्रास. काही धमक्या मिळाल्या आहेत म्हणूनच सुरक्षा पुरवली आहे."

सलमान पुढे म्हणाला,"जे जे मला सांगितलं जातंय मी करत आहे. माझी फिल्म 'किसी का भाई किसी की जान' चा एक डायलॉगही आहे त्यांना एकदा नशिबवान व्हायचे आहे मला १०० वेळा. मी काळजी घेत आहे."

Web Title: salman khan says he feels safe in dubai but there is problem in india amid threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.