'जुडवा २'साठी वरूण धवनची निवड योग्य का म्हणतोय सलमान खान ? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 12:33 PM2017-09-06T12:33:11+5:302017-09-06T18:03:11+5:30

नुकताच वरूण धवनचा जुडवा २ चा ट्रेलर लाँच झाला. चित्रपटाचा पहिलाच ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटातील गाणी ही ...

Salman Khan says 'Varun Dhawan's choice is correct' for 'Twilight 2' Read detailed | 'जुडवा २'साठी वरूण धवनची निवड योग्य का म्हणतोय सलमान खान ? वाचा सविस्तर

'जुडवा २'साठी वरूण धवनची निवड योग्य का म्हणतोय सलमान खान ? वाचा सविस्तर

googlenewsNext
कताच वरूण धवनचा जुडवा २ चा ट्रेलर लाँच झाला. चित्रपटाचा पहिलाच ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटातील गाणी ही हळूहळू सगळ्यांच्या ओठावर रुळू लागली आहेत. १९९७ साली आलेल्या जुडवाने सलमान खानने या चित्रपटाद्वारे धमाल उडवली होती. यातील सलमान, करिश्मा आणि रंभाच्या अभिनयाने सर्वांने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. म्हणूनच जुडवा २च्या वेळेस कलाकार निवडणे फार महत्वाचे होते. सलमानचे म्हणणे आहे की, ''जुडवा २साठी वरुणची केलेली निवड हा एक उत्तम निर्णय आहे. जेव्हा जुडवा २ चा ट्रेलर पहिला तेव्हा खात्री पटली की राजा आणि प्रेम या भूमिकेसांठी वरुणची चॉईस परफेक्ट आहे.''

ALSO READ :  Don't miss : पाहा, ‘जुडवा2’चा धमाकेदार ट्रेलर...!!

वरुणला डबल रोलमध्ये बघण्यासाठी त्याचे चाहते फार दिवसांपासून आतुरत आहेत. जुडवा २ च्या ट्रेलरने जर एवढी धमाल उडवली तर चित्रपट किती मसालेदार असेल याचा अंदाज आपण लावू शकतो.

 वरूण धवन जुडवा २ मध्ये राजा आणि प्रेमची भूमिका साकारणार आहे. तर या चित्रपटात वरुणसह जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्या ही मुख्य भूमिका आहेत. जुडवाच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन ही डेविड धवन यांनी केले होते आणि जुडवा २चे दिग्दर्शनदेखील तेच करतायेत. साजिद नाडीयाडवाला या चित्रपटाची निर्मिती करतो आहे. २९ सप्टेंबर २०१७ रोजी 'जुडवा २' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वरुणचे चाहते त्याला सलमानने साकारलेल्या भूमिकेत बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. सलमानचा ही या चित्रपटात कॅमिओ आहे. वरुण धवनच्या जुडवा २च्या ट्रेलर लाँचिंगला त्याची गर्लफ्रेंड नाताशा दलाल देखील उपस्थित होती.  

Web Title: Salman Khan says 'Varun Dhawan's choice is correct' for 'Twilight 2' Read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.