सलमानसाठीचं बॉलिवूडमध्ये आली, सलमानमुळेचं बॉलिवूड सोडलं! आता करते हे काम !!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 11:38 AM2018-07-02T11:38:58+5:302018-07-02T11:50:06+5:30
संगीता बिजलानी ही सलमानची पहिली अधिकृत गर्लफ्रेन्ड मानली जाते. संगीतानंतर सोमी अली ही सलमानची दुसरी गर्लफ्रेन्ड मानली जाते.
सलमान खानच्या फिल्मी करिअरची जितकी चर्चा झाली नाही,तितकी त्याच्या लव्ह लाईफची झाली. होय, सलमानच्या आयुष्यात अनेक मुली येऊन गेल्या. संगीता बिजलानी ही सलमानची पहिली अधिकृत गर्लफ्रेन्ड मानली जाते. संगीता व सलमानचे लग्न होता होता राहिले, हेही सगळ्यांना ठाऊक आहे. संगीतानंतर सोमी अली ही सलमानची दुसरी गर्लफ्रेन्ड मानली जाते.
सोमी मुळची पाकिस्तानची. पण बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल म्हणूनचं ती ओळखली जाते. सोमीची आई इराकी आणि वडिल पाकिस्तानी आहेत. १२ वर्षांपर्यंत सोमी पाकिस्तानात शिकली. यानंतर आपल्या पालकांसोबत फ्लोरिडाला शिफ्ट झाली. सोमीला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये इंटरेस्ट होता. पण ती बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण सलमान खान होते. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचा क्रश होता. ‘मैंने प्यार किया’ पाहिला आणि तेव्हापासून सलमानसोबतचं लग्न करायचे, असे तिने ठरवले. सोमीचा कल बघून तिच्या आईने तिला मुंबईला पाठवले. पण सोमीला बॉलिवूडपेक्षाही सलमान हवा होता. खरे सांगायचे तर सलमानचा पिच्छा करत करतचं ती फ्लोरिडावरून मुंबईत पोहोचली होती. यावेळी ती केवळ १६ वर्षांची होती.
मुंबईत आल्या आल्या तिने मॉडेलिंग सुरू केले आणि मग बॉलिवूडमध्ये संधी शोधत राहिली. ही ती संधी होती, ज्याद्वारे ती सलमानपर्यंत पोहोचू शकणार होती. अखेर तिची ही इच्छा पूर्ण झाली. चित्रपटांत काम करत असताना एकदिवस ती सलमानला भेटली. एका मुलाखतीत सोमीने हा सगळा प्रवास सांगितला होता. सलमान माझा पहिला बॉयफ्रेन्ड होता. त्याच्यासाठीचं मी बॉलिवूडमध्ये आली. त्याच्याकडून मी खूप काही शिकले. आज मी जे काही आहे, ते त्याच्याचमुळे, असे ती म्हणाली होती.
सलमान व सोमी ८ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान एकदा सलमानने सोमीच्या डोक्यावर काचेची बॉटल फोडली होती़.अर्थात सोमीने हे वृत्त नाकारले होते. असे काहीही झालेले नव्हते. मी पहिल्यांदा ड्रिंक केल्याने सलमान नाराज झाला होता आणि म्हणून त्याने टेबलावर बॉटल आदळली होती, असे तिने सांगितले होते. सोमीने १९९१ ते १९९७ या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. १९९९ मध्ये तिचे व सलमानचे ब्रेकअप झाले. याचे कारण होते, ऐश्वर्या राय. या ब्रेकअपनंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही. यानंतर २०११ मध्ये ती सलमानला भेटली होती. तिनेच याबद्दल सांगितले होते. २०११ मध्ये मी सलमानला भेटले होते. त्यावेळी मी बँकॉकमध्ये होते. सलमानही एका शूटींगसाठी येथे आला होता. येथे आम्ही भेटलो. आता आम्ही आपआपल्या आयुष्यात खूप पुढे गेलो आहोत, असे तिने सांगितले होते.
हीच सोमी आता कुठे आहे? सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्लोरिडाला परतली. येथे तिने सायकॉलॉजीचे शिक्षण घेतले. यानंतर मियामी युनिव्हर्सिटीतून जर्नलिझम केले. यादरम्यान डॉक्युमेंट्री बनवण्यात तिला रस वाटू लागला. पुढे तिने न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीत प्रवेश घेतला. पदवीनंतर सोमीने महिलांच्या आयुष्यावरचे काही लघूपट बनवलेत. २००६ मध्ये तिने महिलांच्या अधिकारांसाठी काम करणे सुरू केले व नो मोअर टीअर्स नावाची संस्था उघडली. पाचव्या वर्षी सोमीवर लैंगिक अत्याचार झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचे खरे कारण होते. आता सोमी जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत. ४२ वर्षांची सोमी कदाचित आजही सलमानवर तेवढेच प्रेम करते. म्हणूनच आजपर्यंत ती विवाहित आहे.