‘लवयात्री’वरून मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रासला सलमान खान, सर्वोच्च न्यायालयात धाव!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 06:46 PM2018-09-27T18:46:30+5:302018-09-27T18:47:11+5:30

सलमान खान त्याचा मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लॉन्च करतोय, ही बातमी आता जुनी झाली. आयुष शर्माचा ‘लवयात्री’ हा चित्रपट रिलीजसाठी तयार आहे आणि आता याच चित्रपटासंदर्भात एक ताजी बातमी आहे. 

salman khan seeks supreme courts help in loveyatri controversy | ‘लवयात्री’वरून मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रासला सलमान खान, सर्वोच्च न्यायालयात धाव!!

‘लवयात्री’वरून मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रासला सलमान खान, सर्वोच्च न्यायालयात धाव!!

googlenewsNext

सलमान खान त्याचा मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लॉन्च करतोय, ही बातमी आता जुनी झाली. आयुष शर्माचा ‘लवयात्री’ हा चित्रपट रिलीजसाठी तयार आहे आणि आता याच चित्रपटासंदर्भात एक ताजी बातमी आहे. होय, आयुष शर्माच्या या चित्रपटाचे नाव आधी ‘लवरात्री’ होते. पण काही धार्मिक संघटनांनी या नावावर आक्षेप घेतल्यानंतर अगदी रिलीजच्या तोंडावर या चित्रपटाचे नाव बदलून ‘लवयात्री’ करण्यात आले. सलमान खानने स्वत: या चित्रपटाच्या नव्या नावाची घोषणा केली होती. पण इतके करूनही हा वाद थांबवण्याची चिन्हे नाहीत. होय, काही धार्मिक संघटना अद्यापही आयुष शर्माच्या या चित्रपटावरून नाराज आहेत आणि सतत चित्रपटाच्या निर्मात्यांना धमक्या दिल्या जात आहेत. या धमक्या आणि दबावामुळे त्रासून सलमानने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. काही वेळापूर्वी एएनआयने ट्विटरवर याची माहिती दिली. सलमानने ‘लवयात्री’ वादासंदर्भात सुप्रीम कोर्टात मदतीची विनंती केली आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी आजच या प्रकरणावर सुनावणी करण्याची तयारी दर्शवली आहे, असे एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अभिराज मिनावला दिग्दर्शित या चित्रपटातून  आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

एफआयआरला स्थगिती
दरम्यान ‘लवयात्री’ विरोधातील एफआयआरवर सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी स्थगिती दिली. या चित्रपटासंदर्भात सलमान व अन्य व्यक्तिंविरोधात आठवडाभरापूर्वी बिहारमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. चित्रपटाच्या शीर्षकातून नवरात्री या हिंदूंच्या उत्सवाची खिल्ली उडवण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले होते. गत १२ सप्टेंबरला उपविभागीय न्यायदंडाधिका-यांच्या आदेशानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आदेशाविरोधात सलमानने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Web Title: salman khan seeks supreme courts help in loveyatri controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.