Salman Khan First Look: सलमान खानच्या नव्या सिनेमातील 'तो' लूक आला समोर, फोटो होतेय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 16:00 IST2022-05-14T15:57:38+5:302022-05-14T16:00:43+5:30
सलमानने इंस्टाग्रामवर त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Salman Khan First Look: सलमान खानच्या नव्या सिनेमातील 'तो' लूक आला समोर, फोटो होतेय व्हायरल
सलमान खान (Salman Khan)ने त्याच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लुक शेअर केला आहे. हा लूक त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलमान खानने त्याच्या आगामी नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सलमानने इंस्टाग्रामवर त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
सलमान खानने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी'च्या शूटिंगदरम्यान काढण्यात आला आहे.नव्या फोटोंमध्ये मोकळे केस, ब्लॅक टी-शर्ट, ब्लॅक जॅकेट, गॉगल चेहऱ्यावर राग आणि हातात लोखंडी रॉड असा सलमानचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. सलमान खानचा हा फोटो पाहता या चित्रपटात भरपूर अॅ क्शन दाखवण्यात येणार असल्याचे दिसते. त्याने फोटोसोबत कॅप्शन लिहिले, 'माझ्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू.'
सलमान खानच्या या नव्या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाच्या नावाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र हा चित्रपट बिग बजेट असल्याचं बोललं जात आहे. 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात सलमान खानशिवाय पूजा हेगडे, आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल देखील दिसणार आहेत.
'कभी ईद कभी दिवाळी' व्यतिरिक्त अभिनेत्याच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' या चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटात सलमान खानही छोट्या भूमिकेत दिसणार आहे.