संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये, 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सलमानने शेअर केला फॅमिली फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 18:47 IST2025-02-14T18:46:49+5:302025-02-14T18:47:02+5:30
सलमान खानने शेअर केलेला हा फोटो सध्या चर्चेत आहे.

संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेममध्ये, 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त सलमानने शेअर केला फॅमिली फोटो
Salman Khan: १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस. या दिवशी आपला क्रश, पार्टनर किंवा जवळच्या व्यक्तींसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं जातं. व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेमी युगल यांच्यापर्यंत मर्यादित नाही. हा दिवस कोणत्याही प्रकारचे प्रेम आणि आपुलकीचा उत्सव असू शकतो. मित्र, कुटुंब आणि प्रियजनांमध्ये हा दिवस साजरा करूनही प्रेम व्यक्त केले जाते. बॉलिवूडचा 'भाईजान' सिंगल मॅन सलमान खाननेही व्हॅलेंटाईन डेनिमित्त सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत त्याने एक अतिशय खास पोस्ट शेअर केली आहे.
सलमान खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहतो. व्हॅलेंटाईन डे निमित्त भाईजाननं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. हा असा तसा फोटो नाही. तस सलमानचा परफेक्ट फॅमिली फोटो (Salman Khan shares family photo) आहे. या फोटोमध्ये सलमानचे संपुर्ण कुटुंब दिसून येत आहे. यात सलमानचे वडील सलीम खान, आई सलमा, हेलन, दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांच्यासह त्यांची मुलं, तर बहिणी आणि मेहुणे देखील दिसत आहेत.
सलमानने हा फोटो शेअर करत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अग्निहोत्रीयन, शर्मनियन आणि खाननियन तुम्हा सर्वांना familitines day च्या खूप शुभेच्छा'. सलमानच्या कुटुंबाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाईजानच्या चाहत्यांना ही पोस्ट खूप आवडली आहे. यावर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'सिकंदर'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत दिसणार आहे. दोघे पहिल्यांदाच एका सिनेमात एकत्र पाहायला मिळणार आहेत.