Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : भाईजान नाही तर मीही नाही! शेराने नाकारलं Katrina -Vicky च्या लग्नाचं आमंत्रण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 02:06 PM2021-12-07T14:06:50+5:302021-12-07T14:08:14+5:30
Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: विकी- कतरिना खास राजस्थानमधील माधोपूर येथे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. या लग्नकार्यातील सुरक्षेची जबाबदारी शेराच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : बहुप्रतिक्षीत ठरत असलेला विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा लग्नसोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी ही जोडी लग्नाच्या बेडीत बांधली जाणार आहे. त्यामुळे कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी या लग्नसोहळ्यासाठी राजस्थानकडे रवाना झाले आहेत. यामध्येच कतरिनाने भाईजान अर्थात सलमान खानला (salman khan) लग्नाचं आमंत्रण न देता त्याचा बॉडीगार्ड शेराला (shera) लग्नपत्रिका पाठवल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, आता या लग्नसोहळ्याला शेरादेखील उपस्थित राहणार नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाईजान नाही तर मीही नाही, असं एकंदरीत शेराविषयी चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
विकी- कतरिना खास राजस्थानमधील माधोपूर येथे डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. त्यामुळे या लग्नसोहळ्याला अत्यंत मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यातच लग्न कार्यातील सुरक्षेची जबाबदारी शेराच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. शेराची 'टायगर सिक्युरिटी' ही एजंसी विकी-कतरिनाच्या वेडिंग वेन्यूवर सुरक्षा पुरवणार आहे. परंतु, या लग्नसोहळ्याला शेरा मात्र अनुपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सलमानमुळे शेराने दिला लग्नाला जाण्यास नकार?
सलमान लवकरच सौदी अरबमध्ये त्याच्या Da-bangg टूरसाठी जाणार आहे. यावेळी त्याच्या सुरक्षेसाठी शेरादेखील त्याच्यासोबत जाणार आहे. त्यामुळेच सलमान आणि शेरा हे दोघेजण विकी-कतरिनाच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच सलमान त्याच्या आगामी टायगर ३ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र, या चित्रीकरणातून ब्रेक घेत तो रियादला Da-bangg च्या टूरसाठी जाणार आहे. हा इव्हेंट १० डिसेंबरपासून सुरु होणार आहे.