ट्रेलर कुठे आहे? भाईजानच्या 'सिकंदर'वर आली रिलीज डेट पुढे ढलकण्याची वेळ! मेकर्सवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:45 IST2025-03-21T15:45:03+5:302025-03-21T15:45:59+5:30

ए आर मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' नक्की कुठे रखडला?

salman khan starrer sikandar movie trailer not out yet release date may get postponed ? | ट्रेलर कुठे आहे? भाईजानच्या 'सिकंदर'वर आली रिलीज डेट पुढे ढलकण्याची वेळ! मेकर्सवर दबाव

ट्रेलर कुठे आहे? भाईजानच्या 'सिकंदर'वर आली रिलीज डेट पुढे ढलकण्याची वेळ! मेकर्सवर दबाव

अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) सिनेमा जेव्हा जेव्हा ईदच्या मुहुर्तावर रिलीज झाला आहे तेव्हा तो सुपरहिट झाला आहे. भाईजानचा या ईदला 'सिकंदर' (Sikandar) सिनेमा रिलीज होत आहे ज्याची सर्वत्र चर्चा आहे. ३० मार्च रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमाचा अद्याप ट्रेलरही आलेला नाही.  त्यामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची वेळ येते की काय अशी चर्चा आहे. ए आर मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' नक्की कुठे रखडला?

भाईजानच्या 'सिकंदर'चा सध्या केवळ टीझर आला आहे. तसंच यातील दोन गाणीही रिलीज झाले आहेत. मात्र रिलीजबाबतीत मेकर्स मागेच राहिल्याची शंका आहे. अद्याप सिनेमाची ट्रेलरही आलेला नाही. त्यामुळे सिनेमा ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार का असा प्रश्न चाहते विचारत आहेत. 

सिनेमाचं नक्की किती काम बाकी आहे? 

मिड डेच्या रिपोर्टनुसार, 'सिकंदर' च्या शूटिंगचं सध्या पॅच वर्क सुरु आहे. त्यामुळे मेकर्सवर सिनेमाच्या ट्रेलर आणि रिलीजचा दबाव वाढत चालला आहे. इतकंच नाही तर आताच वीकेंडला सिनेमाचे दोन सीन्स शूट झाले आहेत असा खुलासा क्रू मेंबरने केला. त्यामुळे सिनेमाच्या एडिटिंगचं काम बाकी आहे. क्रू मेंबरच्या माहितीनुसार, "शनिवारी मुंबईतील विले पार्लेतील गोल्डन टोबॅको फॅक्टरीमध्ये ५० लोकांसोबत एक छोटा अॅक्शन सीक्वेन्स शूट केला गेला. पुढच्या दिवशी गोरेगांव येथील फिल्मालय स्टुडिओमध्येही छोटा सीन शूट झाला. हा ट्रेलरमध्येही पाहायला मिळेल. त्यामुळे आता त्याच्या ए़डिटिंगचं काम सुरु आहे. सिनेमाच्या पॅचवर्कचं शूटिंग तासभर चाललं जो अतिशय महत्वाचा आहे."

ट्रेलर रिलीज न करणं मेकर्सची स्ट्रॅटेजी?

सिनेमाच्या टीझरनंतर ट्रेलर आणि गाणी एकामागोमाग रिलीज होतात. मात्र 'सिकंदर'च्या ट्रेलरचे काहीच चिन्ह दिसत नाहीत. ए आर मुरुगदास हे सिनेमात अतिशय बारीकसारीक गोष्टींवर लक्ष देतात. त्यामुळे सध्या पोस्ट प्रोडक्शन टीम दिवरात्र मेहनत घेत आहे. सिनेमात सलमान खानशिवाय रश्मिका मंदाना, प्रतिक बब्बर, शरमन जोशी यांचीही भूमिका आहे.

Web Title: salman khan starrer sikandar movie trailer not out yet release date may get postponed ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.