Sikandar Teaser: सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी येणार 'सिकंदर' चा टीझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:23 IST2024-12-16T12:23:03+5:302024-12-16T12:23:34+5:30
भाईजानच्या 'सिकंदर' सिनेमाच्या टीझरची उत्सुकता, 'या' दिवशी येणार भेटीला

Sikandar Teaser: सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी येणार 'सिकंदर' चा टीझर
'दबंग' अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतिक्षित 'सिकंदर' (Sikandar) सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. एकीकडे जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना सध्या सलमान कडक सुरक्षाव्यवस्थेतही सिनेमाचं शूटिंग करत आहे. आधी हैदराबाद मध्ये त्याने सिनेमाचं शेड्युल पूर्ण केलं तर आता मुंबईत शूट सुरु आहे. दरम्यान सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भाईजानच्या वाढदिवशी 'सिकंदर' चा टीझर रिलीज केला जाणार असल्याची शक्यता आहे.
'सिकंदर' सिनेमाची निर्मिती सलमान खानचा खास मित्र साजिद नाडियादवाला करत आहे. तर दाक्षिणात्य दिग्दर्शक ए आर मुरुगदोस सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सध्या सिनेमाच्या फायनल शेड्युलचं शूट सुरु आहे. क्लायमॅक्स शूट करायचा बाकी आहे. जानेवारी अखेरपर्यंत सिनेमाचं शूट पूर्ण होईल. दरम्यान या अॅक्शनपॅक्ड सिनेमात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे. पहिल्यांदाच त्यांची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सलमानचे चाहते सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत. येत्या काही दिवसात म्हणजेच २७ डिसेंबर रोजी सलमान खान ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या दिवशी तो सिकंदर सिनेमाचं टीझर रिलीज करत चाहत्यांना गिफ्ट देईल अशी चर्चा आहे. तसंच सिनेमाचं पोस्टरही त्याच दिवशी आऊट केलं जाईल. सलमानच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राईज असणार आहे.
सिनेमाचं स्पेशल टीझर एडिट करण्याची प्रक्रिया जोरात सुरु आहे. सिनेमात सलमानचा कधीही न पाहिलेला अवतार बघायला मिळणार आहे. तसंच 'किक' सिनेमानंतर सलमान-साजिद नाडियादवाला ही जोडी परत आली आहे. यामध्ये अभिनेत्री काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, सुनील शेट्टी, अंजनी धवन, सत्यराज हे हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.