सलमान खानने कॅमेऱ्याच्या मागे राहुन सुरु केली 'भारत'ची शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 11:19 AM2018-08-14T11:19:44+5:302018-08-14T11:28:18+5:30
सलमान खानने सुल्तान आणि टायगर जिंदा है सारखे सुपरहिट सिनेमा देणारा दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या भारत सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे. प्रियांका चोप्राने हा सिनेमा सोडल्यानंतर भारत चर्चेत आला
सलमान खानने सुल्तान आणि टायगर जिंदा है सारखे सुपरहिट सिनेमा देणारा दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या भारत सिनेमाचे शूटिंग सुरू केले आहे. प्रियांका चोप्राने हा सिनेमा सोडल्यानंतर भारत चर्चेत आला. भारतच्या टीम 'माल्टा'मध्ये शूटिंग सुरु केली आहे.
सलमानने स्वत: आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात सलमान कॅमेरासमोर दिसत नसून कॅमेऱ्याच्या मागे दिसतोय. सलमानने फोटोला कप्शनसुद्धा दिले आहे की, ''चांगला फोटो काढण्यासाठी फोकस करावा लागतो. तशी तर ही गोष्ट आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी लागू पडते.'' सलमानचा हा फोटो अतुल अग्निहोत्रीनेसुद्धा त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या शूटिंग वाट बघत होता. या सिेनमात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार आहे. तसेच दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २०१४ साली प्रद्रशित झालेला दक्षिण कोरियाई चित्रपट 'ओड टू माई फादर'मधून प्रेरणा घेऊन भारत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ सलमानच्या पित्याच्या भूमिकेत आहे. यापूर्वी सलमान व जॅकी ‘वीर’मध्ये एकत्र दिसले होते. 'भारत' चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. हा सिनेमा २०१९ला ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे.