फाटक्या जीन्सच्या फॅन्सचे श्रेय जाते या अभिनेत्याला, याने भारतात आणली ही फॅशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 03:58 PM2021-03-19T15:58:39+5:302021-03-19T16:13:37+5:30
फाटकी जीन्स ही फॅशन नव्वदीच्या दशकापासून भारतात आली असून फाटक्या जीन्ससाठी लोक अधिक पैसे मोजतात.
सध्याच्या काळात महिला फाटकी जीन्स घालणे पसंत करतात. त्या आपल्या मुलांवर चांगले संस्कार कसे काय करणार, असे वादग्रस्त उद्गार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी काही दिवसांपूर्वी काढले. रावत यांच्या उद्गारांचा देशभरातील महिला नेत्या व विविध पक्षांनी तीव्र निषेध केला आहे.
फाटकी जीन्स ही फॅशन नव्वदीच्या दशकापासून भारतात आली असून फाटक्या जीन्ससाठी लोक अधिक पैसे मोजतात. जीन्स जितकी अधिक फाटलेली तितकी त्याची किंमत अधिक असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
भारतात फाटकी जीन्स घालण्याची फॅशन बॉलिवूडला दबंग खान सलमान खानने भारतात आणली. प्यार किया तो डरना क्या हा सलमान खानचा चित्रपट चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटातील सगळीच गाणी लोकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटातील ओ ओ जाने जाना.... हे गाणे तर प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरले होते. याच गाण्यात आपल्याला सलमान फाटलेल्या जीन्समध्ये दिसला होता.
सलमानने प्यार किया तो डरना क्या या चित्रपटात फाटकी जीन्स घातली होती. त्यानंतर ही फॅशनच झाली. अनेक चित्रपटात कलाकार आपल्याला फाटक्या जीन्समध्ये दिसू लागले. केवळ कलाकाराच नव्हे तर सामान्य लोकांना देखील सलमानची ही फॅशन चांगलीच आवडली.