OMG...! 'मैंने प्यार किया'च्या सेटवर दोन-चार नाही तर तब्बल ३० चपात्या खायचा दबंग खान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 07:15 AM2019-07-09T07:15:00+5:302019-07-09T07:15:00+5:30
सलमान खानला त्याच्या कारकीर्दीच्या सुरूवातीला वजन वाढविण्यासाठी सांगितले होते.
बॉलिवूडमधील फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या कलाकारांच्या यादीत बॉलिवूडचा दबंग खान सलमानचाही समावेश आहे. सलमानने त्याच्या सिनेमातील भूमिकेसाठी वजन घटविले व वाढवलेदेखील आहे. याशिवाय तो त्याच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो.
सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी तो खूप बारीक होता.त्याने करियरच्या सुरूवातीपासूनच त्याचे लुक्स व फिटनेससोबत प्रयोग केले होते. एका मुलाखतीत सलमानने सांगितले की, माझ्या चित्रपटाच्या सुरूवातीच्या काळात वजन वाढविण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.कारण करियरच्या सुरूवातीच्या काळात मी खूप बारीक होतो. त्यावेळी मला जे खायला मिळायचे ते मी खायचो. मला आठवतंय की मी माझ्या मैंने प्यार किया चित्रपटाच्या सेटवर तीस चपात्या खायचो आणि खूप केळीदेखील खायचो.
त्याने पुढे सांगितले की, आता असा काळ आहे जिथे मी जेवणाचा सुगंध जरी घेतला तरी माझे वजन वाढते. सुरूवातीच्या काळातील स्ट्रगल आता बदलला आहे. आता खूप सांभाळून खावे लागते कारण वजन वाढण्याची शक्यता असते. तेच आधी काहीही खाल्लं तरी वजन वाढायचं नाही. मी सुलतान व भारत चित्रपटासाठी फार कमी वेळात वजन वाढविले व घटविले आहे. यादरम्यान मला तरूण दिसण्यासाठी व वयस्कर दिसण्यासाठी पंधरा किलो वजन वाढवावे व घटवावे लागले होते.
सलमानच्या भारत चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींहून अधिक कमाई केली होती. सलमान सध्या दबंग ३ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.