Salman Khan : लायगर आपटल्यानंतर साऊथ दिग्दर्शक सलमान खानसोबत काम करणार; १३ वर्षांचे आहे एक कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 02:04 PM2022-12-20T14:04:40+5:302022-12-20T14:09:11+5:30
बॉलिवुडचा दबंग सलमान खान लवकरच प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शकासोबत काम करणार आहे. दोघांमध्ये नवीन प्रोजेक्ट बाबत चर्चा सुरु आहे.
Salman Khan : बॉलिवुडचा दबंग सलमान खान लवकरच प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शकासोबत काम करणार आहे. दोघांमध्ये नवीन प्रोजेक्ट बाबत चर्चा सुरु आहे. विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) आणि अनन्या पांडेचा (Ananya Pande) 'लायगर' (Liger) सिनेमा जोरदार आपटला. या अपयशातून सावरण्यासाठी लायगर चे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सलमान खानसोबत चर्चा करत आहेत.
सलमान खानने पुरी जगन्नाथ यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आधीच बोलून दाखवली आहे. सलमानला स्क्रीप्टही आवडली आहे. तेलगु फिल्म इंडस्ट्रीत अशी देखील चर्चा आहे की पुरी यांनी सलमानला स्क्रीप्ट ऐकवली. सलमान चित्रपट करण्यास उत्सुक आहे. मात्र अजुन अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दोघांमध्ये आहे १३ वर्षांपुर्वीचे कनेक्शन
दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि सलमान खान एकत्र काम करतील अशा चर्चा खरं तर १३ वर्षांपुर्वीच सुरु झाल्या होत्या. सलमान खानने १३ वर्षांपुर्वी २००९ मध्ये वॉंटेड चित्रपट केला होता. महेश बाबू च्या पोकिरी सिनेमाचा तो रिमेक होता. प्रभुदेवाने वॉंटेड दिग्दर्शित केला होता. तेव्हापासूनच पुरी यांना सलमानसोबत काम करायचे होते. पुरी जगन्नाथ म्हणाले, ' मी सलमान सोबत वॉंटेड नंतर काम करण्याची योजना बनवत होतो. मला सलमान आवडतो. मला आशा मी त्याच्यासोबत एकदा तरी काम करेन.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांनी याआधी एका सिनेमात एकत्र काम केले आहे. मेगास्टार चिरंजीवी यांच्या गॉडफादर सिनेमात सलमानने कॅमियो केला होता तर पुरी यांनी सिनेमात पत्रकाराची भुमिका केली होती.