सलमान खान या चित्रपटाच्यावेळी एका दिवसाला तब्बल खायचा ३० चपात्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 07:23 PM2020-12-30T19:23:10+5:302020-12-30T19:24:45+5:30
सलमाननेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.
मैंने प्यार किया या चित्रपटाने सलमान आणि भाग्यश्रीचे संपूर्ण करियरच बदलून टाकले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. हा चित्रपट सलमान आणि भाग्यश्रीच्या कारकिर्दीतील पहिला हिट चित्रपट ठरला. या चित्रपटाने सलमान आणि भाग्यश्रीला पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळवून दिले. या चित्रपटासाठी सलमानला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याच्या आणि भाग्याश्रीला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात देखील आले होते. या चित्रपटातील भाग्यश्री आणि सलमानच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा रंगली होती. तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी भाग्यश्रीला सलमानपेक्षा अधिक मानधन मिळाले होते. सलमानला या चित्रपटात काम करण्यासाठी केवळ ३० हजार रुपये मिळाले होते तर भाग्यश्रीला या चित्रपटासाठी १ लाख मानधन मिळाले होते.
मैंने प्यार किया या चित्रपटाविषयी आणखी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत. मैंने प्यार किया या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सलमान तब्बल ३० चपात्या खायच्या. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण हे खरे आहे. सलमान या चित्रपटाच्या सेटवर दररोज ३० चपात्या आणि अनेक केळी खायचा.
सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी तो खूप बारीक होता. त्याने करियरच्या सुरुवातीपासूनच त्याचे लुक्स आणि फिटनेससोबत प्रयोग केले होते. एका मुलाखतीत सलमानने सांगितले की, माझ्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळात वजन वाढविण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. कारण करियरच्या सुरुवातीच्या काळात मी खूप बारीक होतो. त्यावेळी मला जे खायला मिळायचे ते मी खायचो. मला आठवतंय की मी माझ्या मैंने प्यार किया चित्रपटाच्या सेटवर तीस चपात्या खायचो आणि खूप केळीदेखील खायचो.