सलमान खान रात्रीबेरात्री या कारणासाठी जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी, कारण वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 01:31 PM2020-02-10T13:31:12+5:302020-02-10T13:32:39+5:30

सलमान आणि शिल्पाचे अफेअर असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी मीडियात रंगली होती.

salman khan used to go to shilpa shetty house in the night, this was the reason | सलमान खान रात्रीबेरात्री या कारणासाठी जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी, कारण वाचून बसेल धक्का

सलमान खान रात्रीबेरात्री या कारणासाठी जायचा शिल्पा शेट्टीच्या घरी, कारण वाचून बसेल धक्का

googlenewsNext
ठळक मुद्देशिल्पाने सांगितले होते की, सलमान अनेकवेळा मध्यरात्री माझ्या घरी यायचा. पण तो मला भेटण्यासाठी नव्हे तर माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करायला यायचा. माझे वडील आणि तो सोबत ड्रिंक करायचे आणि कित्येक तास गप्पा मारत बसायचे.

शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांनी औजार, गर्वः प्राईज अँड ऑनर, फिर मिलेंगे, शादी कर के फंस गया यार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक स्टेज शो मध्ये देखील ते एकत्र थिरकताना दिसले आहेत. ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूपच चांगले फ्रेंड्स आहेत. 

शिल्पाने एकेकाळी बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. आता ती निकम्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये रिएंट्री करत आहे. तिने नुकतीच तिचा लाडका मित्र सलमान खानच्याबिग बॉस 13 या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात सलमान आणि शिल्पाने प्रचंड धमाल मस्ती केली.

तुम्हाला माहीत आहे का, सलमान आणि शिल्पाचे अफेअर असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी मीडियात रंगली होती. या दोघांच्या अफेअरची चर्चा होण्यामागे एक खास कारण होते. शिल्पाला तिच्या एका मुलाखतीच्या दरम्यान सलमान खान आणि तिच्या नात्याविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी शिल्पाने सांगितले होते की, आम्ही दोघे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. पण त्याशिवाय आमच्या दोघांमध्ये काहीही नाते नाहीये. आम्ही कधी अनेक वर्षं एकमेकांना ओळखत असलो तरी आम्ही कधी डेटवर देखील गेलो नाही. 

ती पुढे म्हणाली होती की, सलमान हा खूपच चांगला असून त्याचे माझ्यासोबतच नव्हे तर माझ्या कुटुंबियांसोबत देखील खूपच चांगले संबंध आहेत. त्याची माझ्याप्रमाणेच माझ्या वडिलांसोबत खूपच चांगली मैत्री होती. तो अनेकवेळा मध्यरात्री माझ्या घरी यायचा. पण तो मला भेटण्यासाठी नव्हे तर माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करायला यायचा. माझे वडील आणि तो सोबत ड्रिंक करायचे आणि कित्येक तास गप्पा मारत बसायचे. मी त्यावेळी मस्तपैकी झोपलेली असायचे. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याला खूपच वाईट वाटले होते. सलमान आम्हाला घरी भेटायला आला, त्यावेळी खूपच उदास होता. कित्येक मिनिटे तो टेबलावर डोके ठेवून शांत बसला होता.

Web Title: salman khan used to go to shilpa shetty house in the night, this was the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.