Corona : भाईजान संतापला! तुफान व्हायरल होतोय ‘जनता कर्फ्यु’वरचा सलमानचा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:29 PM2020-03-22T12:29:00+5:302020-03-22T12:32:34+5:30

यह पब्लिक हॉलिडे नहीं है भाई...

salman khan video on coronavirus home quarantine janta curfew protection-ram | Corona : भाईजान संतापला! तुफान व्हायरल होतोय ‘जनता कर्फ्यु’वरचा सलमानचा हा व्हिडीओ

Corona : भाईजान संतापला! तुफान व्हायरल होतोय ‘जनता कर्फ्यु’वरचा सलमानचा हा व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देसलमानने या व्हिडीओमध्ये #IndiaFightsCorona हा हॅशटॅग वापरला आहे.

जीवघेण्या कोरोना व्हायरसने अख्ख्या जगाचा ताबा घेतला आहे. एकट्या भारतात कोरोना बाधितांची संख्या 350 वर गेलीय. या व्हायरसने जगभर भीती व दहशतीचे वातावरण असतान त्यापासून बचावासाठी गर्दीपासून लांब राहणे, वेळोवेळी हात धुणे अशा सर्व गोष्टी करणे आवश्यक आहे. सरकार, प्रशासनापासून बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सर्वच कोरोनापासून वाचण्यासाठी शक्य ते उपाय करण्याचे आणि स्वत:ची काळजी घेण्याची विनंती करताना दिसत आहेत. अशात सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये भाईजान सर्वांवर बिथरल्याचे पाहायला मिळतेय.


सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो सर्वांवर रागावलेला दिसत आहे. याचे कारण म्हणजे लोकांचा निष्काळजीपणा. होय, कोरोनाचे संकट अधिक गंभीर होत असताना अद्यापही काही लोकांमध्ये निष्काळजीपणा दिसतोय. नेमक्या याच कारणाने सलमानने असा निष्काळजीपणा करणा-यांचा क्लास घेतला आहे.

‘बसमध्ये, ट्रेनमध्ये, मार्केटमध्ये  प्रत्येक ठिकाणी लोक बाहेर जाण्यासाठी भांडताना दिसत आहेत. हा कोणताही पब्लिक हॉलिडे नाही. हा खूप गंभीर विषय आहे. हे सर्व बंद करा. मास्क वापरा, स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्या, हात धुवा, स्वच्छ राहा, गर्दीपासून दूर राहा. हे सर्व करायला तुम्हाला अडचण काय आहे. यामुळे जर एखाद्याचा जीव वाचत असेल. अनेकांचा जीव वाचत असेल तर हे करा. हा सर्वांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सर्वांना की घरी राहा आणि स्वत:ची काळजी घ्या,’ असे सलमान या व्हिडीओमध्ये म्हणतोय.


सलमानने या व्हिडीओमध्ये #IndiaFightsCorona हा हॅशटॅग वापरला आहे. याशिवाय या व्हिडीओमध्ये त्याने आदित्य ठाकरेंना टॅग केले आहे. या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. प्रत्येकजण यात सलमानला सपोर्ट करताना दिसत आहेत.

Web Title: salman khan video on coronavirus home quarantine janta curfew protection-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.