'सिकंदर'च्या सेटवरुन व्हिडीओ लीक; भाईजानचा स्वॅग पाहून चाहते म्हणतात- "१००० कोटींची कमाई निश्चित"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:56 IST2025-01-28T17:55:41+5:302025-01-28T17:56:48+5:30
सलमान खानच्या आगामी 'सिकंदर'च्या सेटवरुन शूटिंगचा व्हिडीओ लीक झालाय (salman khan, sikandar)

'सिकंदर'च्या सेटवरुन व्हिडीओ लीक; भाईजानचा स्वॅग पाहून चाहते म्हणतात- "१००० कोटींची कमाई निश्चित"
'सिकंदर' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. सलमान खानची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. काहीच दिवसांपूर्वी 'सिकंदर' सिनेमाचा टीझर रिलीज झाला. या टीझरमध्ये सलमान खान अॅक्शन करताना दिसला. अशातच 'सिकंदर' विषयीचे नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यामधील एक विशेष गोष्ट म्हणजे 'सिकंदर'मधील सलमान खानचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत सलमान खानचा स्वॅग पाहायला मिळतोय.
'सिकंदर'च्या सेटवरील लीक व्हिडीओत काय?
'सिकंदर'च्या सेटवरील लीक व्हिडीओत सलमान खानचा वेगळाच अंदाज बघायला मिळतोय. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, आजूबाजूला रेल्वे स्टेशन आणि गर्दी आहे. याशिवाय भाईजान कॅज्युअल शर्ट, जीन्स परिधान करुन स्वॅगमध्ये चालत येत असलेला दिसतो. लीक व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. 'सिकंदर'मध्ये असणारे रिअल लोकेशन्स आणि सलमानचा हटके लूक बघताच हा सिनेमा १००० कोटी कमावेल अशी चाहत्यांना खात्री आहे.
A R Murugadoss #ARM is going to give 1000 cr Movie 🔥🔥🔥🔥#SalmanKhan💪🔥#Sikandarpic.twitter.com/p7w568Qy67
— Anjali Prakash (@anjaliprakash05) January 27, 2025
'सिकंदर' कधी रिलीज होणार?
साजिद नाडियादवाला निर्मित ए. आर. मुरुगोदास दिग्दर्शित 'सिकंदर' सिनेमात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. तर त्याच्यासोबत रश्मिका मंदाना झळकणार आहे. २०२५ मध्ये मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. ३० किंवा ३१ मार्च २०२५ ला सिनेमा रिलीज व्हायची शक्यता आहे. परंतु रश्मिकाला झालेल्या दुखापतीमुळे सध्या शूटिंग लांबलंय. त्यामुळे 'सिकंदर'चा ईदचा मुहुर्त टळणार का, असा प्रश्न सर्वांना आहे.