सलमान खानचा व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत, सोफ्यावरुन उठताना घेतला आधार; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:51 AM2024-08-29T10:51:07+5:302024-08-29T10:51:26+5:30

मुंबईतील एका कार्यक्रमात तो आला होता. त्याचे तेथील काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Salman Khan viral video looking old fans worried about actor s health | सलमान खानचा व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत, सोफ्यावरुन उठताना घेतला आधार; Video व्हायरल

सलमान खानचा व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत, सोफ्यावरुन उठताना घेतला आधार; Video व्हायरल

सगळ्यांचा लाडका अभिनेता भाईजान सलमान खान (Salman Khan) नुकताच एका इव्हेंटमध्ये आला होता. यावेळी त्याचा लूक पाहून चाहते मात्र चिंतेतच पडलेत. गेल्या काही दिवसांपासून सलमानच्या लूकमध्ये बराच बदल झालेला दिसून येतोय. आपला लाडका हिरो आता म्हातारा होतोय हे पाहून चाहत्यांना फारच वाईट वाटतंय. मुंबईतील एका कार्यक्रमात तो आला होता. त्याचे तेथील काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

काल मुंबईत लहान मुलांसाठी 'बच्चे बोले मोरेया' या इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. तसंच सलमान खान, सोनाली बेंद्रे यांनी देखील हजेरी लावली. इव्हेंटमध्ये सलमानचा सोनालीला मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. याशिवाय एका व्हिडिओने चाहत्यांना चिंतेत पाडलंय. इव्हेंटमध्ये सलमान खान सोफ्यावर बसलेला असताना त्यावरुन उठताना त्याला आधार घ्यावा लागला. शिवाय त्याचं वजनही वाढलेलं दिसतंय. पोट पुढे, चेहऱ्यावर सुरकुत्या अशा अवस्थेत तो दिसला. त्यात त्याने ग्रे रंगाचा टीशर्ट आणि जीन्स घातली होती. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.


या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत लिहिले, 'आपला बालपणीचा हिरो म्हातारा होतोय','तो ५८ वर्षाचा असूनही जर तो असा दिसत असेल तर kudos to him','सलमानला नक्की झालंय काय?'. सलमानच्या तब्येतीवर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

सलमान लवकरच आगामी 'सिकंदर' सिनेमात दिसणार आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय 'टायगर vs पठाण','दबंग 4' या सिनेमांचीही चर्चा आहे.

Web Title: Salman Khan viral video looking old fans worried about actor s health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.