ऐश्वर्या, कतरिना नाही तर 'ही' अभिनेत्री आज असती सलमान खानची पत्नी, घरी लग्नाचा प्रस्तावही घेऊन गेला होता भाईजान पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 02:45 PM2023-12-14T14:45:01+5:302023-12-14T14:46:07+5:30
साठीच्या उंबरठ्यावरही अविवाहित असलेल्या सलामनच्या लग्नाची चाहते अजूनही वाट पाहत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर अफेअर आणि रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. पण, ८०-९०च्या दशकात सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रीबरोबर भाईजानने लग्नाची स्वप्न पाहिली होती.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. साठीच्या उंबरठ्यावरही अविवाहित असलेल्या सलामनच्या लग्नाची चाहते अजूनही वाट पाहत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर अफेअर आणि रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. पण, भाईजानच्या डोक्यावर अक्षता काही पडल्या नाहीत. संगीता बिजलानीबरोबर सलमानचं शुभमंगल सावधान होता होता राहिलं. सलमानचं नाव ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफबरोबरही जोडलं गेलं होतं. सलमानच्या इतर अफेअरपेक्षा ऐश्वर्या आणि कतरिनाबरोबरच्या अफेअरची सर्वाधिक चर्चा रंगली होती.
पण, सलमान खानला ऐश्वर्या किंवा कतरिनाबरोबर लग्न करायचं नव्हतं. तर सलमानला ८०-९०च्या दशकात सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या जुही चावलाबरोबर संसार थाटायचा होता. एका मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला होता. जुही चावलाबरोबर लग्न करण्याबाबत सलमानने अभिनेत्रीच्या वडिलांकडे मागणही घातली होती. पण, जुही चावलाच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. वडिलांच्या विरोधामुळे सलमानचं जुही चावलाबरोबर लग्न करण्याचं स्वप्न भंग झालं होतं.
दरम्यान, सलमान अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'टायगर ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कतरिना कैफ आणि सलमान खान मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४६५ कोटींचा गल्ला जमवला.