​सलमानला हवीत आणखी दहा हजार चित्रपटगृहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2016 01:57 AM2016-03-26T01:57:09+5:302016-03-25T22:24:48+5:30

देशात चित्रपटगृहांची कमतरता आहे,हे काही आमचे मत नाही, तर मेगास्टार सलमान खानचे मत आहे. देशात आणखी दहा हजार चित्रपटगृहे ...

Salman Khan wants more than ten thousand theaters | ​सलमानला हवीत आणखी दहा हजार चित्रपटगृहे

​सलमानला हवीत आणखी दहा हजार चित्रपटगृहे

googlenewsNext
शात चित्रपटगृहांची कमतरता आहे,हे काही आमचे मत नाही, तर मेगास्टार सलमान खानचे मत आहे. देशात आणखी दहा हजार चित्रपटगृहे असायला हवीत, असे मत सलमानने व्यक्त केले. देशात चांगले चांगले चित्रपट तयार होत आहेत. त्यामानाने चित्रपटगृहांची संख्या अतिशय तोकडी आहे. देशात आणखी दहा हजार चित्रपटगृहे असायला हवीत. शहराच्या बाहेर सिनेमागृहे उघडली जायला हवीत, असे सलमान म्हणाला. शहराच्या मुख्य भागात रियल इस्टेटच्या आभाळाला भिडलेल्या किमती व अशा अनेक कारणांनी केवळ आॅफिससाठी जागा बळकावण्यावर भर दिला जातो. अशास्थितीत सिनेमागृहे शहराबाहेरच उघडली जाऊ शकतात. माझ्या मते, याठिकाणी अधिकाधिक चित्रपटगृहे बनवली जायला हवीत, असेही तो म्हणाला.

Web Title: Salman Khan wants more than ten thousand theaters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.